Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात आज आयपीएलचा सामना होत आहे. केकेआरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. आरसीबीने फलंदाजी करताना 182 धावा केल्या. कोलकाताला आरसीबीला 183 धावांचं लक्ष्य दिलं आहे.
विराट कोहलीने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. कोहलीने 59 चेंडूत 83 धावा केल्या. आयपीएल 2024 मधील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या मिचेल स्टार्कची विराट कोहलीने चांगलीच धुलाई केली. विराट कोहली आणि मिचेल स्टार्क पहिल्यांदाच आयपीएलमध्ये आमनेसामने आले. स्टार्कच्या पहिल्या षटकांतील पहिल्याच चेंडूत चौकार मारत डावाची सुरुवात केली. त्यानंतर संघासाठी तिसरं षटक टाकण्यासाठी आलेल्या स्टार्कला विराट कोहलीने एक खणखणीत षटकार आणि दोन चौकार लगावले.
केकेआरचे 25 कोटी पाण्यात?
कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) 25 कोटी पाण्यात गेलेले दिसत आहेत. केकेआरने आयपीएल 2024 च्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते, ज्यासह तो या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ठरला. आरसीबीविरुद्ध स्टार्कने चार षटकांमध्ये 11.80 च्या इकॉनॉमीसह 47 धावा दिल्या.
हैदराबादविरुद्धही स्टार्क अपयशी
केकेआरने IPL 2024 चा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळला आणि पहिल्याच सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी स्टार्कचा धुव्वा उडवला होता. हैदराबादविरुद्ध स्टार्कने 4 षटकात 13.25 च्या इकॉनॉमीमध्ये 53 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. आता पुन्हा एकदा तो आरसीबीविरुद्धच्या सलामीच्या स्पेलमध्ये महागडा ठरला. अशा स्थितीत केकेआरला 24.75 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसते. स्टार्कला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू Playing XI:
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत (w), दिनेश कार्तिक, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.
Royal Challengers Bengaluru (Playing XI): Virat Kohli, Faf du Plessis(c), Cameron Green, Rajat Patidar, Glenn Maxwell, Anuj Rawat(w), Dinesh Karthik, Alzarri Joseph, Mayank Dagar, Mohammed Siraj, Yash Dayal
कोलकाता नाइट रायडर्स Playing XI:
फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रमणदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
Kolkata Knight Riders (Playing XI): Philip Salt(w), Venkatesh Iyer, Shreyas Iyer(c), Ramandeep Singh, Rinku Singh, Andre Russell, Sunil Narine, Mitchell Starc, Anukul Roy, Harshit Rana, Varun Chakaravarthy