Kieron Pollard on Hardik Pandya : मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्यासाठी यंदाचा आयपीएल हंगाम अतिशय खराब ठरत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईचा लागोपाठ पराभव होत आहेच. त्याशिवाय फलंदाजी आणि गोलंदाजीमध्येही हार्दिक पांड्या फ्लॉप ठरत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईला सहा सामन्यात चार पराभवाचा सामना करावा लागलाय. हार्दिक पांड्यावर चाहत्यांकडून ट्रोलिंग करण्यात येतच आहे. त्याशिवाय अनेक माजी खेळाडूंनीही हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. हार्दिक पांड्यावर चोहोबाजूनं टीका होत असताना कायरन पोलार्डनं बचाव केला आहे. हार्दिक पांड्यासाठी कायरान पोलार्ड मैदानात उतरला आहे.
मुंबई इंडियन्सचा फलंदाजी कोच कायरान पोलार्ड हार्दिक पांड्याच्या सपोर्टसाठी समोर आला. मुंबई इंडियन्सच्या पराभवाला हार्दिक पांड्याला जबाबदार म्हणणाऱ्या लोकांमुळे कायरान पोलार्ड त्रस्त झाला. चेन्नईविरोधातील पराभवानंतर कायरान पोलार्डनं चाहत्यांना आवाहान केलेय, की यासाठी हार्दिक पांड्याला जबाबदार धरु नये. दरम्यान, हार्दिक पांड्याच्या अखेरच्या षटकात धोनीनं लागोपाठ तीन षटकार ठोकत 26 धावा वसूल केल्या होत्या. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांकडून पराभवास हार्दिक पांड्याला जबाबदार धरलं जात आहे. यावरुन कायरन पोलार्ड यानं हार्दिक पांड्याचा बचाव केलाय.
चेन्नईविरोधात हार्दिक पांड्याला गोलंदाजीमध्येही अपयश आले. हार्दिक पांड्याने 3 षटकांमध्ये 43 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या. फलंदाजीतही तो फ्लॉप ठरला. त्याशिवाय नेतृत्वही तितकं चांगल न दिसल्याचं दिग्गजांनी म्हटलेय. यंदाच्या हंगामात हार्दिक पांड्याला कोणत्याही स्तरावर अद्याप प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. हार्दिक पांड्याच्या सपोर्टसाठी कायरन पोलार्ड मैदानात उतरला आहे.
हार्दिक पांड्याचा बचाव करताना पोलार्ड म्हणाला की, "आपल्याला आशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. खेळाडूंवर व्यक्तीगत टीका करत असल्यामुळे त्रस्त झालो आहे. क्रिकेट हा सांघिक खेल आहे. पांड्याकडे आत्मविश्वास भरलेला आहे. संघातील इतर खेळाडूंसोबत हार्दिक पांड्याचं संबंध चांगले आहेत. क्रिकेटमध्ये तुमचे चांगले आणि वाईट दिवस येत असतात. "
हार्दिक पांड्याला टी 20 विश्वचषकात निवडलं जाण्याच्या शक्यतेवरही कायरन पोलार्डनं भाष्य केले आहे. जर हार्दिक पांड्याची टी 20 विश्वचषकासाठी निवड होईल, तेव्हा प्रत्येकजण त्याचं कौतुक करेल, असे पोलार्ड म्हणाला. पुढील सहा आठव्यानंतर हार्दिक पांड्या टीम इंडियाचं नेतृत्व करेल. आपण सर्वजण त्याचा उत्साह वाढवण्यसाठी प्रयत्न करु. त्याच्या चांगली कामगिरी होईल, असेच सर्वांना वाटेल, असे पोलार्ड म्हणाला.