Josh Hazlewood Rejoin IPL 2025 : आरसीबीने आयपीएल 2025 च्या प्लेऑफसाठी आपले तिकीट बुक केले आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कामगिरी अद्भुत राहिली आहे. पण, प्लेऑफपूर्वी काही खेळाडू आरसीबी संघ सोडून मायदेशी परततील. याचा परिणाम संघाच्या कामगिरीवरही होऊ शकतो असे मानले जात होते. दरम्यान, सर्व आरसीबी चाहत्यांसाठी आणि संघ व्यवस्थापनासाठी मोठी आनंदाची बातमी येत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामात आरसीबीकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज जोश हेझलवूड प्लेऑफ सामन्यांसाठी संघात सामील होऊ शकतो.
आरसीबीसाठी आनंदाची बातमी
प्लेऑफपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आनंदाची बातमी आहे. 2025 च्या आयपीएलमध्ये खेळल्या गेलेल्या 10 सामन्यात 18 विकेट्स घेणाऱ्या जोश हेझलवूडच्या प्लेऑफमध्ये संघात सामील होऊ शकतो. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या मते, हेझलवूड त्याच्या दुखापतीतून बरा होत आहे आणि आरसीबीसाठी प्लेऑफ सामन्यांमध्ये खेळताना दिसू शकतो.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, खांद्याच्या दुखापतीमुळे हेझलवूड ऑस्ट्रेलियाला परतला होता आणि असे मानले जात होते की तो या हंगामात आरसीबीकडून खेळताना दिसणार नाही. पण, हेझलवुडचे पुनर्वसन सुरू आहे आणि तो लवकरच भारतात जाण्यासाठी विमान पकडू शकतो. हेझलवुडच्या पुनरागमनाबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.
आरसीबीने आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत एकूण 12 सामने खेळले आहेत. या काळात संघाने 8 सामन्यांमध्ये विजयाची चव चाखली आहे, तर 3 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. आरसीबीला प्लेऑफचे तिकीट मिळाले आहे. पण, संघ आता अव्वल दोन स्थानांवर लक्ष केंद्रित करेल. जर बंगळुरू संघाने उर्वरित दोन्ही सामने जिंकण्यात यश मिळवले, तर पहिल्या क्वालिफायरमध्ये थेट खेळण्याचे संघाचे स्वप्न पूर्ण होईल. आरसीबीचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्सशी होईल.
हे ही वाचा -
