WPL 2023 : महिला प्रीमियर लीगच्या (WPL 2023) पहिल्या सत्रात गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (MIW vs DCW) यांच्यात सामना झाला. या सामन्यात मुंबईने दिल्लीवर 8 गडी राखून मात करत स्पर्धेतील विजयाची हॅट्रिक केली. मात्र, या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रिग्सने आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांचीच मन जिंकली. सामन्यात जेमिमाने मुंबईची स्फोटक फलंदाज हेली मॅथ्यूजचा रनिंग डाईव्ह घेत उत्कृष्ट झेल टिपला. आता जेमिमाच्या या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जेमिमाने टीपला शानदार झेल
गुरुवारी मुंबईविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्याच्या 11व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हेली मॅथ्यूजला कॅप्सीच्या चेंडूवर मोठा फटका खेळायचा होता. तिला या चेंडूला योग्य वेळ देता आला नाही आणि चेंडू सीमापार जाऊ शकला नाही. त्याचवेळी चेंडू हवेत जात असल्याचं पाहून जेमिमा रॉड्रिग्सने सीमारेषेवरून धाव घेतली आणि जमिनीवर पडणाऱ्या चेंडूवर एक उत्तम डाईव्ह टाकत झेल पूर्ण केला. जेमिमाचा हा झेल उत्कृष्ट ठरला. जेमिमाच्या या कॅचचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे. चाहतेही याला स्पर्धेतील सर्वोत्तम कॅच म्हणत आहेत.
पाहा VIDEO-
मुंबईनं केली विजयाची हॅट्रिक
महिलांच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. त्याने या स्पर्धेत सलग तिसरा सामना जिंकला आहे. दिल्लीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबईने 8 गडी राखून शानदार विजय मिळवला. त्याआधी मुंबई इंडियन्सने पहिल्या सामन्यात गुजरातला 143 धावांनी मात दिल्यावर दुसऱ्या सामन्यात आरसीबीला 9 विकेट्सनी मात दिली. या दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा आठ विकेट्सने पराभव केला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना मुंबईला 106 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युतरात मुंबईने दोव विकेट्सच्या मोबदल्यात हे आव्हान सहज पार केले. मुंबईने गोलंदाजी आणि फलंदाजीत पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी केली. मुंबईकडून फिरकी गोलंदाज सायका इशाक आणि हेली मॅथ्यूज यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या तर यास्तिका भाटियाने हिने 41 धावांचे योगदान दिलेय. या विजयासह मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहचला आहे.
हे देखील वाचा-