Irfan Pathan Commentary IPL 2025 : आयपीएलची सुरुवात होऊन एक आठवडा झाला आहे. यामध्ये चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. दरम्यान, टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणबद्दल धक्कादायक खुलासा कर आहे. पण यावेळी ब्रॉडकास्टर्सनी त्यात टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणचा समावेश केला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून तो प्रत्येक मोठ्या क्रिकेट स्पर्धेत समालोचक म्हणून दिसत होता, असे असूनही, त्याचे नाव यादीत नसल्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले. त्याच्या कॉमेंट्रीबद्दल काही खेळाडूंनी तक्रार केल्याचा दावा करण्यात आला होता. आता त्याच्याबद्दल आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना पॅनेलमधून वगळल्याबद्दल आधीच माहिती होती. याची माहिती मिळताच त्याने त्यात राहण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण कमेंट्री पॅनलमध्ये त्याला जागा मिळाली नाही. एका वृत्तानुसार, इरफान पठाण आयपीएल कमेंट्री पॅनलमध्ये आपले स्थान वाचवण्यासाठी सतत प्रयत्न करत होता. त्याने त्याच्या एका जवळच्या मित्राच्या मदतीने ब्रॉडकास्टरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ब्रॉडकास्टर सहमत झाले नाही आणि त्याला वगळले. अशाप्रकारे, मित्राच्या मदतीनंतरही त्याची नोकरी वाचवता आली नाही.

सूत्रांचे म्हणणे आहे की, इरफान त्याच्या वैयक्तिक अजेंड्यानुसार ऑन एअर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बोलायचा. एका सूत्राने सांगितले की, "इरफानचे नाव समालोचन पॅनेलमध्ये समाविष्ट केले गेले असते, परंतु गेल्या दोन वर्षांपासून तो सतत काही खेळाडूंविरुद्ध त्याचा वैयक्तिक अजेंडा पुढे करत होता आणि सिस्टमला हे आवडले नाही." याशिवाय, त्याचे वर्तन हे देखील एक मोठे कारण मानले जाते ज्यामुळे बीसीसीआय त्याच्यावर नाराज आहे.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी दरम्यान केलेल्या टिप्पण्यांमुळे प्रकरण चिघळले

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इरफान पठाणचे काही खेळाडूंशी चांगले संबंध नव्हते आणि हे त्याच्या कॉमेंट्री आणि ऑनलाइन पोस्टमध्ये स्पष्टपणे दिसून येत होते. जरी त्याने कधीही कोणाचेही थेट नाव घेतले नाही, पण बॉर्डर-गावसकर ट्रॉफी दरम्यान पठाणने काही खेळाडूंबद्दल केलेल्या टिप्पण्यांमुळे प्रकरण आणखी चिघळले. या मालिकेदरम्यान त्याच्या भाष्यानंतर, एका खेळाडूने त्याला फोनवर ब्लॉकही केले, असा दावाही या अहवालात करण्यात आला आहे. 

इरफान पठाणची नव्यानं केली सुरुवात 

इरफान पठाण पूर्वी समालोचनाद्वारे चांगली कमाई करत होता, पण आता त्याने एक नवीन सुरुवात केली आहे. त्याने स्वतःचे युट्यूब चॅनेल सुरू केले आहे, जिथे तो क्रिकेटवर चर्चा करतो आणि आपले मत मांडतो. त्याच्या चॅनेलला आतापर्यंत 1.5 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स मिळाले आहेत.