IPL Points Table 2022 : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या चार संघांनी आपले प्लेऑफमधील स्थान पक्के केलेय. मुंबईने दिल्लीचा पराभव केल्यामुळे फाफच्या नेतृत्वातील आरसीबीला प्लेऑफचे तिकीट मिळाले आहे. पण अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवल्यानंतरही मुंबईचा संघ तळाची राहिला आहेय. गुजरात, राजस्थान, लखनौ आणि आरसीबी हे चार संघ गुणातिलेकत पहिल्या चार क्रमांकावर आहेत. तर आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ चेन्नई आणि मुंबई तळाशी आहेत. चेन्नई नवव्या क्रमांकावर आहे तर मुंबई दहाव्या क्रमांकावर आहे..
पाहा गुणतालिका
| क्रमांक | संघाचे नाव | एकूण सामने | विजय | पराभव | नेट रन रेट | गुण |
| 1 | गुजरात | 14 | 10 | 4 | 0.316 | 20 |
| 2 | राजस्थान | 14 | 9 | 5 | 0.298 | 18 |
| 3 | लखनौ | 14 | 9 | 5 | 0.251 | 18 |
| 4 | आरसीबी | 14 | 8 | 6 | -0.253 | 16 |
| 5 | दिल्ली | 14 | 7 | 7 | 0.204 | 14 |
| 6 | कोलकाता | 14 | 6 | 8 | 0.146 | 12 |
| 7 | पंजाब | 13 | 6 | 7 | -0.043 | 12 |
| 8 | हैदराबाद | 13 | 6 | 7 | -0.230 | 12 |
| 9 | चेन्नई | 14 | 4 | 10 | -0.203 | 8 |
| 10 | मुंबई | 14 | 4 | 10 | -0.506 | 8 |
कोलकातामध्ये होणार प्लेऑफचे दोन सामने -पहिला प्लेऑफ सामना : कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानवर क्वालीफायर 1 सामना होणार आहे. गुणतालिकेतील अव्वल दोन संघामध्ये 24 मे रोजी सामना रंगणार आहे. विजेता संघ थेट फायनलमध्ये धडक मारणार आहे. तर पराभूत झालेल्या संघाला एक संधी मिळणार आहे. पराभूत झालेला संघ क्वालीफायर दोन मध्ये खेळणार आहे. एलिमिनेटरचा विजेता संघ क्वालिफायर दोनमध्ये पोहचतो.
दूसरा प्लेऑफ सामना : एलिमिनेटरचा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर खेळवला जाणार आहे. 25 मे रोजी हा सामना होणार आहे. गुणतालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघामध्ये हा सामना रंगणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर राहुलचा लखनौ संघ आहे. तर मुंबईच्या विजयानंतर आरसीबी चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. त्यामुळे 25 मे रोजी आरसीबी आणि लखनौ यांच्यात सामना होणार आहे.
प्लेऑफचं वेळापत्रक - क्वालिफायर 1: गुजरात vs राजस्थान, 24 मे - कोलकाताएलिमिनेटर: लखनौ vs आरसीबी, 25 मे - कोलकाताक्वालिफायर 2 - 27 मे - अहमदाबादफायनल: 29 मे - अहमदाबाद