Lalit Modi : कोची टस्कर्स प्रकरणात शशी थरुर यांना कोण पाठिंबा देत होतं? ललित मोदीचे सोनिया गांधींसह काँग्रेस नेत्यांची नावं घेत खळबळजनक दावे
Lalit Modi : आयपीएलचा माजी चेअरमन ललित मोदीनं एएनआयला दिलेल्या मुलाखतीत कोची टस्कर्स, सुनंदा पुष्कर, शशी थरुर यांच्यांसंदर्भात खळबळजनक दावे केलेत.

लंडन : आयपीएलचा माजी चेअरमन ललित मोदी यानं एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत देताना 2010 मध्ये आयपीएलमधील कोची टस्कर्स संदर्भातील प्रकरणात स्फोटका दावे केले आहेत. ललित मोदी सध्या लंडनमध्ये असून त्यानं काँग्रेस नेत्यांनी शशी थरुर यांचा त्या प्रकरणात बचाव केला होता, असा दावा केला आहे. कोची टस्कर्सच्या कन्सोर्टियममधील सुनंदा पुष्कर यांच्या कथित संशयास्पद इक्विटी संरचनेवरुन त्यांचा प्रवेश रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर यूपीए सरकारकडून दबाव वाढवला गेल्याचा आरोप ललित मोदीनं केला.
ललित मोदीला शशी थरुर याला कोणाचा पाठिंबा होता, असं विचारलं असता त्यानं सोनिया गांधी यांचं नाव घेतलं. अहमद पटेल, प्रणव मुखर्जी यांचा फोन आला. त्यानंतर राजीव शुक्लाचा देखील फोन आलेला, शुक्लानं हे करावं ते करावं असं सांगितल्याचा दावा ललित मोदीनं केला.
कोची टस्कर्सच्या कन्सोर्टियमचे आर्थिक मॉडेल दाखवण्यात आले होतं, त्याकडे दुर्लक्ष करण्यास नकार दिल्यानंतर वाद सुरु झाला, असं ललित मोदीनं म्हटलं. 350 दशलक्ष अमेरिकनं डॉलर्सपर्यंत टीम वाढवण्यात आली होती, त्याच गणितामुळं पुढं आर्थिक संकट कोसळलं, असा दावा ललित मोदीनं केला. सुनंदा पुष्करशिवाय इतर शेअर होल्डर्स तिथं होतं. सुनंदा पुष्करला 25 टक्के शेअर दिले होते, ती कोण होती? महसुलाच्या 15 टक्के वाटा देत होता, असा प्रश्न कोची टस्कर्सच्या कन्सोर्टियमला विचारल्याची आठवण ललित मोदीनं सांगितली. एखाद्याला 350 दशलक्ष डॉलर्स कसे देऊ शकता, जिथं 75 टक्के शेअर होल्डर्स 100 टक्के खर्च उचलत आहेत, आणि एखाद्या व्यक्तीला 25 टक्के इक्विठी मोफत मिळते , असा सवाल ललित मोदीनं केला.
#WATCH | IPL founder and first chairman Lalit Modi says, "I know the truth, my friends know the truth. What is there in name clearing? If for 17 years we haven't been able to clear our names, and somebody keeps calling you what they have been calling you, you just live with it… pic.twitter.com/uTypoUmibi
— ANI (@ANI) June 4, 2026
सुनंदा पुष्करला टीम मिळाली तेव्हा तिच्यासाठी एक शेअर 10 रुपयांना होता,मात्र त्याची किंमत 1 लाख रुपये होती. त्यांच्या 10 रुपयांची किंमत 1 पैसे होती. मला माहिती होतं हे पुढं जाऊन कोसळणार आहे. दोन वर्षात तसंच घडलं, असा दावा ललित मोदीनं केला.
कोची टस्कर्ससाठी दबाव होता
ललित मोदीनं या मुलाखतीत पुढे बंगळुरुत रात्री उशिरा झालेल्या बैठकीत ऑफिशिअल फ्रँचायजी करारावर सही करण्यास नकार दिल्याचा दावा केला आहे. त्या कन्सोर्टियमचे शेअरधारक सार्वजनिक होई पर्यंत सही न करण्याची भूमिका घेतल्याचं ललित मोदीनं म्हटलं. मला सुनंदा पुष्कर यांच्याबाबत माहिती नव्हती, ती कोण होती. एका व्यक्तीनं ऑटोमोबाईल डीलरची मुलगी असल्याचं सांगितलं. मार्केटिंग क्षेत्रातील नामांकित व्यक्तीमत्व असल्याचं सांगितलं. मात्र, त्यांना मार्केटिंगमधील मी नामांकित व्यक्ती असून ती व्यक्ती कोण होती, माहिती नसल्याचं सांगितलं. सुनंदा पुष्कर यांची ओळख सार्वजनिक झाल्याशिवाय सही करण्यास नकार दिल्यानं शशी थरुर यांचा फोन आलेला. शशी थरुर यांनी सुनंदा पुष्करबाबत चौकशी करु नये असं सांगितलं. शशी थरुर यांनी छापेमारी करण्याची धमकी दिल्याचा आरोप देखील ललित मोदीनं केला.
कोची टस्कर्स साठी केरळमध्ये मैदान नसून देखील कोचीला आयपीएलमध्ये बोली लावण्यास परवानगी दिल्याचं ललित मोदीनं म्हटलं. बीसीसीआयनं 2011 मध्ये कोची टस्कर्सवर बंदी घातली.कोचीनं एक हंगाम खेळला त्यात ते आठव्या स्थानावर राहिले. एप्रिल 2011 मध्ये प्रकरण समोर आल्यानंतर शशी थरुर यांनी राजीनामा दिल्याचं ललित मोदीनं म्हटलं. ललित मोदीनं पुढं सुनंदा पुष्कर यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा दाखला दिला, त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचं देखील मोदीनं म्हटलं.
कोची टस्कर्ससाठी बीसीसीआय चेअरमन शशांक मनोहर यांच्याकडून आलेल्या दबावाचा उल्लेख देखील ललित मोदीनं केला. याशिवाय ललित मोदीनं सुषमा स्वराज आणि वसुंधरराजे यांच्यासोबत असलेल्या संबंधावर देखील भाष्य केले.
#WATCH | On the 'fugitive' tag, IPL founder and first chairman Lalit Modi says, "I'm not running at all... The Indian government has a long arm. You can't take on the government of India. And I don't intend to, and I don't want to... Not a single case against me has been… pic.twitter.com/zwqALNoY1g
— ANI (@ANI) June 4, 2026
लाईव्ह टीव्ही
Before You Go
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
महत्त्वाच्या बातम्या


















