IPL 2024 चेन्नई: भारतीय क्रिकेट बोर्डानं (BCCI)2008 मध्ये आयपीएलची सुरुवात केली होती. पहिल्या स्पर्धेसाठी ८ फ्रँचायजी तयारी करण्यात आल्या होत्या. पहिल्या आयपीएलमध्ये 8 संघ सहभागी झाले होते. लीग स्टेज, सेमी फायनल आणि फायनल अशा टप्प्यात पहिलं आयपीएल पार पडलं होतं. त्यावेळी भारतीय टीमचा कॅप्टन असलेल्या महेंद्रसिंह धोनीकडे (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्जची (Chennai Super Kings) धुरा सोपवण्यात आली होती. आयपीएलचं पहिलं पर्व असल्यानं धोनीसह इतर टीमच्या सर्व कॅप्टन्सपुढं मोठं आव्हान होतं.
चेन्नईसाठी पहिलं आयपीएल कसं होतं?
भारतानं 2007 मध्ये पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानं देशभरात टी-20 क्रिकेटची मोठी क्रेझ होती. चेन्नईनं 2008 च्या आयपीएलमध्ये पहिला सामना किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाविरुद्ध होता. या मॅचमध्ये धोनीच्या टीमनं 33 धावांनी विजय मिळवला होता. आयपीएल स्पर्धा डबल राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळवलं जातं त्यामुळं सीएसकेचे त्या आयपीएलमध्ये प्रत्येक टीमविरुद्ध दोन दोन सामने झाले होते.
चेन्नईच्या टीमनं लीग स्टेजमध्ये 14 मॅच खेळल्या त्यामध्ये त्यांना ८ मॅचमध्ये विजय मिळाला तर ६ मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. चेन्नईनं 16 गुण मिळवत गुणतालिकेत तिसरा क्रमांक मिळवला होता. सेमीफायनलमध्ये पुन्हा एकदा सीएसके आणि पंजाब यांच्यात लढत झाली. यामध्ये धोनीच्या टीमनं 9 विकेटनं विजय मिळवला आणि सीएसके फायनलमध्ये गेली.
सीएसके विरुद्ध फायनलमध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ होता.चेन्नईनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 163 धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्सला अखेरच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर एका रनची विजयासाठी आवश्यकता होती. राजस्थानला ती रन घेण्यात यश आलं आणि त्यांनी पहिल्या आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरलं.2008 च्या स्पर्धेत विजेतेपदापासून एक पाऊल दूर राहिल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जनं विजेतपदावर 2010 मध्ये नाव कोरलं. चेन्नईनं आतापर्यंत आयपीएलमध्ये 5 वेळा विजेतेपद मिळवलं आहे.
चेन्नईसाठी 2008 मध्ये सर्वाधिक धावा कुणी केल्या?
चेन्नई सुपर किंग्जनं आयपीएलच्या पहिल्याच पर्वात अंतिम फेरीपर्यंत धडक दिली होती. चेन्नईसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू सुरेश रैना ठरला होता. सुरेश रैनानं पहिल्या आयपीएलमध्ये 16 मॅचमध्ये 421 धावा केल्या होत्या. रैनाचं त्या सीझनमध्ये 142.71 इतकं स्ट्राइक रेट होतं. महेंद्रसिंह धोनीनं देखील 16 मॅचमध्ये 414 धावा केल्या होत्या.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जकडून पहिल्या सीझनमध्ये एल्बी मोर्केलनं सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. एल्बी मोर्केलनं १३ मॅचमध्ये 17 विकेट घेतल्या होत्या. मनप्रीत गोनी या भारतीय गोलंदाजानं 16 मॅचमध्ये 17 विकेट घेतल्या होत्या.
संबंधित बातम्या:
MS Dhoni : होय हे धोनीचं शेवटचं आयपीएल..., सुनंदन लेले यांचं एबीपी माझाशी बोलताना मोठं वक्तव्य
MS Dhoni : सगळं ठरलेलं होतं? चेन्नईचं नेतृत्त्व ऋतुराजकडे, धोनीनं फेसबुक पोस्टमधून दिलेले संकेत