Unavailable players for IPL 2026 : आयपीएलच्या सुरुवातीला अजून काही काळ बाकी असला तरी त्याआधीच सर्व संघांना मोठा धक्का बसला आहे. अनेक खेळाडू स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत, त्यामुळे संघांचे समीकरण बिघडले आहेत. आता फ्रँचायझी संघांना या खेळाडूंचे पर्याय शोधण्याची कसरत करावी लागत आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत आणखी वैद्यकीय अपडेट्स समोर येण्याची शक्यता आहे.

सर्वात मोठा धक्का कोलकाता नाइट रायडर्सला बसला आहे. वेगवान गोलंदाज आकाश दीप (Akash Deep) हा पाठीच्या खालच्या भागातील स्ट्रेस इन्जुरीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी तो पूर्णपणे फिट होऊ शकला नाही. याशिवाय आणखी एक वेगवान गोलंदाज हर्षित राणा हा देखील आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही, कारण तो सध्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर सावरण्याच्या प्रक्रियेत आहे.

दुसरीकडे, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना हा स्पर्धेच्या सुरुवातीला उपलब्ध असणार नाही. अलीकडे झालेल्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक दरम्यान त्याच्या पिंडरीच्या स्नायूला ताण आला होता. त्यामुळे तो एप्रिलच्या मध्यापर्यंतच संघात सहभागी होईल, अशी अपेक्षा आहे.

तब्बल 18 खेळाडूं जायबंदी, पाहा कोण-कोण झालं बाहेर?

हर्षित राणा (केकेआर) : गुडघ्याची दुखापत, संपूर्ण हंगामासाठी संघाबाहेर.

आकाश दीप (केकेआर): दुखापतग्रस्त (पुनर्वसन), स्थिती अस्पष्ट.

मथिशा पाथिराना (केकेआर): पोटरीला ताण, सलामीच्या सामन्यासाठी संघाबाहेर.

नॅथन एलिस (चेन्नई): हॅमस्ट्रिंगची दुखापत, संपूर्ण हंगामासाठी संघाबाहेर.

मॅथ्यू शॉर्ट (चेन्नई): अंगठ्याची दुखापत, सुरुवातीच्या सामन्यातून संघाबाहेर.

सॅम करन (राजस्थान): जांघेची दुखापत, संपूर्ण स्पर्धेसाठी संघाबाहेर.

ॲडम मिल्ने (राजस्थान): हॅमस्ट्रिंगची दुखापत, संपूर्ण स्पर्धेसाठी संघाबाहेर.

पॅट कमिन्स (हैदराबाद): पाठीची दुखापत, सलामीच्या सामन्यासाठी संघाबाहेर.

जॅक एडवर्ड्स (हैदराबाद): पायाची दुखापत, संपूर्ण हंगामासाठी संघाबाहेर.

ईशान मलिंगा (हैदराबाद): खांद्याची दुखापत, स्थिती अस्पष्ट.

जोश हेझलवूड (बंगळूरू): हॅमस्ट्रिंग/घोट्याची दुखापत, सलामीच्या सामन्यासाठी संघाबाहेर.

अथर्व अंकोलेकर (मुंबई): गुडघ्याची दुखापत, संपूर्ण स्पर्धेतून बाहेर.

लॉकी फर्ग्युसन (पंजाब): मुलगा झाल्यामुळे सलामीच्या सामन्यातून बाहेर.

वानिंदू हसरंगा (लखनौ): हॅमस्ट्रिंगला ताण, सलामीच्या सामन्यातून बाहेर.

मयंक यादव (लखनौ): स्नायूला ताण, सलामीच्या सामन्यातून बाहेर.

मोहसिन खान (लखनौ): गुडघ्याची समस्या, स्थिती अस्पष्ट.

जोश इंग्लिस (लखनौ): वैयक्तिक रजा, सलामीच्या सामन्यातून बाहेर.

मिचेल स्टार्क (दिल्ली): कामाच्या ताणाचे व्यवस्थापन, सलामीच्या सामन्यातून बाहेर.

हे ही वाचा -

Dasun Shanaka News : श्रीलंकेच्या कर्णधाराची PSLला लाथ! पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून शनाकाची भारताशी डील; कोणत्या संघात खेळणार?