एक्स्प्लोर

IPL Final Venue : आयपीएलच्या प्ले ऑफ आणि फायनल मॅचची ठिकाणं ठरली, नरेंद्र मोदी स्टेडियमवर 31 मे रोजी फायनल, बीसीसीआयची मोठी घोषणा

IPL 2026 Playoffs Date And Venue: बीसीसीआयनं आयपीएल 2026 च्या प्लेऑफ मॅचेस आणि अंतिम सामन्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

IPL 2026 Playoffs Date And Venue नवी दिल्ली : बीसीसीआयनं आयपीएलच्या 19 व्या हंगामातील प्लेऑफ मॅचेस आणि अंतिम सामन्याचं ठिकाण निश्चित केलं आहे. प्लेऑफ सामन्यांची ठिकाणं, तारखांची घोषणा बीसीसीआयनं केली आहे. हे सामने अहमदाबाद, न्यू चंदीगड आणि धर्मशाला या ठिकाणी हे सामने होणार आहेत. सलग दुसऱ्यांदा आयपीएलची फायनल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. 

IPL Final आयपीएल फायनल अहमदाबादमध्ये

आयपीएलमधील पंरपरेनुसार या हंगामातील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या होमग्राऊंडवर म्हणजेच एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणं अपेक्षित होतं. मात्र, आरसीबीनं गेल्या वर्षी विजेतेपद मिळवल्यानंतर बंगळुरुत झालेल्या रोड शोनंतर चेंगराचेंगरी झाली होती, त्यात काही जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं पुन्हा एकदा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदाबादमध्ये यापूर्वी 2023, 2022 आणि 2025 मध्ये आयपीएल फायनल खेळवण्यात आली आहे.  

धर्मशाळामध्ये पहिल्यांदा प्लेऑफची मॅच

बीसीसीआयनं एक प्रसिद्धीपत्रक जारी केली आहे. आयपीएल फायनलचं आयोजन बंगळुरुमध्ये होणार होती, ते ठिकाण पहिल्यांदा निश्चित करण्यात आलं होतं. मात्र, स्थानिक संघ आणि अधिकाऱ्यांच्या काही मागण्यांमुळं आणि बीसीसीआयनं निश्चित केलेल्या निर्देशाच्या बाहेर जाऊ शकत नसल्यानं अंतिम सामन्याचं ठिकाण बदल आहोत, असं म्हटलं. लॉजिस्टिक्स संदर्भातील कारणांमुळं प्लेऑफचे सामने तीन ठिकाणांवर खेळवले जाणार असल्याचं बीसीसीआयनं सांगितलं.  

बीसीसीआयच्या निर्णयानुसार क्वालिफायर-1  चा सामना धर्मशालाच्या एचपीसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. क्वालिफायर 1 चा सामना गुणतालिकेत अनुक्रमे 1 आणि 2 स्थानावर असणाऱ्या संघात होईल. हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करेल. यानंतर न्यू चंदीगडमध्ये एलिमिनेटरचा सामना होईल. हा सामना गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या संघात होईल.  एलिमिनेटरचा सामना 27 मे रोजी होईल. या सामन्यात विजयी झालेला संघ क्वालिफायर -1 मध्ये पराभूत झालेल्या संघासोबत क्वालिफायर-2 मध्ये  खेळेल. क्वालिफायर-2 चा सामना न्यू चंदीगडमध्ये होईल. हा सामना 29 मे रोजी होईल.

दरम्यान, हिमाचल प्रदेशातील धर्मशाळामध्ये पहिल्यांदा आयपीएलचा प्लेऑफचा सामना होईल. बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार अंतिम सामना 31 मे रोजी अहमदाबादमध्ये  नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.  

आयपीएल प्लेऑफ वेळापत्रक

क्वालिफायर-1 : 26  मे - एचपीसीए स्टेडियम, धर्मशाला
एलिमिनेटर- : 27 मे - न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, न्यू चंडीगड
क्वालीफायर-2 :  29 मे - न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, न्यू चंडीगड
फाइनल -  : 31 मे- नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajat Patidar PBKS vs RCB IPL 2026 : प्लेऑफच्या तोंडावर RCBने अचानक बदलला कर्णधार; रजत पाटीदार बाहेर, नव्या कर्णधाराची घोषणा; नेमकं काय घडलं?
प्लेऑफच्या तोंडावर RCBने अचानक बदलला कर्णधार; रजत पाटीदार बाहेर, नव्या कर्णधाराची घोषणा; नेमकं काय घडलं?
PBKS vs RCB LIVE Score : RCBचा कर्णधार बदलला, पंजाब किंग्जने जिंकला टॉस; बंगळुरूविरुद्ध धर्मशाला येथे प्रथम गोलंदाजीचा निर्णय
PBKS vs RCB LIVE Update : RCBचा कर्णधार बदलला, पंजाब किंग्जने जिंकला टॉस; बंगळुरूविरुद्ध धर्मशाला येथे प्रथम गोलंदाजीचा निर्णय
IPL मध्ये मोठा ट्विस्ट, ज्या आरसीबीला आयुष्यभर ट्रोल केलं, त्यांच्याच विजयासाठी सीएसकेचे चाहते देव पाण्यात बुडवून बसले, चक्रावून टाकणारं समीकरण
IPL मध्ये मोठा ट्विस्ट, ज्या आरसीबीला आयुष्यभर ट्रोल केलं, त्यांच्याच विजयासाठी सीएसकेचे चाहते देव पाण्यात बुडवून बसले, चक्रावून टाकणारं समीकरण
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता
Pune MNS Morcha Against Fuel Price Hike : इंधन दरवाढीविरोधात मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा | ABP Majha
Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajinikanth: 'मला खूप आश्चर्य वाटलं', विजय सीएम होताच चक्क सुपरस्टार रजनीकांतवर खुलासा करण्याची वेळ! स्टॅलिन भेटीवरूनही थेट भाष्य, नेमकं असं घडलं तरी काय?
'मला खूप आश्चर्य वाटलं', विजय सीएम होताच चक्क सुपरस्टार रजनीकांतवर खुलासा करण्याची वेळ! स्टॅलिन भेटीवरूनही थेट भाष्य, नेमकं असं घडलं तरी काय?
धक्कादायक! नाशिकमध्ये घटसर्प रोगाच्या प्रादुर्भावाने 2 चिमुकल्यांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा हादरली, नागरिकांमध्ये भीती
धक्कादायक! नाशिकमध्ये घटसर्प रोगाच्या प्रादुर्भावाने 2 चिमुकल्यांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा हादरली, नागरिकांमध्ये भीती
दादा कोंडकेंसोबत काळ गाजवला, अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या; व्ही. शांताराम पुरस्कार शासनाला परत, आनंदाश्रमात ठेवला
दादा कोंडकेंसोबत काळ गाजवला, अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या; व्ही. शांताराम पुरस्कार शासनाला परत, आनंदाश्रमात ठेवला
पुण्यातील धक्कादायक घटना; वडिलांनीच मुलाच्या अंगावर ॲसिडसदृश्य द्रव्य फेकलं; गुन्हा दाखल होताच फरार
पुण्यातील धक्कादायक घटना; वडिलांनीच मुलाच्या अंगावर ॲसिडसदृश्य द्रव्य फेकलं; गुन्हा दाखल होताच फरार
आता ऑस्ट्रेलियातही भारतीय वंशाचा थेरपिस्ट 'अशोक खरात' निघाला; मसाज पार्लरमध्ये मसाज करताना तब्बल 61 महिलांसोबत गुप्त व्हिडिओ करत नको नको ते कारनामे
आता ऑस्ट्रेलियातही भारतीय वंशाचा थेरपिस्ट 'अशोक खरात' निघाला; मसाज पार्लरमध्ये मसाज करताना तब्बल 61 महिलांसोबत गुप्त व्हिडिओ करत नको नको ते कारनामे
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर रणरणत्या उन्हात आंदोलन; 75 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर, राजू शेट्टी आणि पोलिसांची शाब्दिक चकमक
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर रणरणत्या उन्हात आंदोलन; 75 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर, राजू शेट्टी आणि पोलिसांची शाब्दिक चकमक
Bacchu Kadu on Eknath Shinde CM Post: महाराष्ट्रात सर्व्हे केला तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रि‍पदासाठी जास्त पसंती, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
महाराष्ट्रात सर्व्हे केला तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रि‍पदासाठी जास्त पसंती, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
श्रेयस अय्यर मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचणार, धोनी आणि कोहलीनंतर असा करणारा पाचवाच कॅप्टन होणार
श्रेयस अय्यर मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचणार, धोनी आणि कोहलीनंतर असा करणारा पाचवाच कॅप्टन होणार
Embed widget