IPL 2025 RCB vs PBKS: बंगळुरूने घेतला बदला, पंजाबचा 7 गडी राखून केला पराभव, कोहलीने ठोकले अर्धशतक

IPL 2025 Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Live Updates: आयपीएल 2025 च्या हंगामात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे.

किरण महानवरLast Updated: 20 Apr 2025 06:56 PM

पार्श्वभूमी

IPL 2025 Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Live Updates: आयपीएल 2025 मध्ये (IPL 2025) आज रजत पाटीदारचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि श्रेयस अय्यरचा पंजाब किंग्स (Punjab Kings vs Royal Challengers...More

बंगळुरूने घेतला बदला, पंजाबचा 7 गडी राखून केला पराभव, कोहलीने ठोकले अर्धशतक

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा सात विकेट्सने पराभव केला. आयपीएल 2025 च्या 37व्या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करत 158 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तर, आरसीबीने 18.5 षटकांत लक्ष्य गाठले. त्यासाठी विराट कोहलीने दमदार कामगिरी केली.


आरसीबीकडून विराट कोहलीने 54 चेंडूंचा सामना करत 73 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने 7 चौकार आणि एक षटकार मारला. त्याच वेळी, देवदत्त पडिक्कलने 35 चेंडूंचा सामना करत 61 धावा केल्या. त्याने 5 चौकार आणि 4 षटकार मारले. शेवटी, जितेश शर्मा 11 धावांवर नाबाद राहिला. त्याने षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला.