एक्स्प्लोर

LSG vs RCB : विराट कोहलीनं पाया रचला, कर्णधार जितेश शर्मानं विजयाचा कळस चढवला, बंगळुरुचा लखनौवर दणदणीत विजय

RCB vs LSG : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं लखनौ सुपर जायंटसला 6 विकेटनं पराभूत केलं आहे. जितेश शर्मा आणि मयंक अग्रवालच्या भागिदारीनं मॅच फिरली.

जयपूर : आयपीएलच्या 18 व्या हंगामातील शेवटच्या साखळी सामन्याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. या साखळी सामन्यात लखनौ सुपर जायंटस आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने होते. आरसीबीनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौनं मिशेल मार्शचं अर्धशतक आणि रिषभ पंतच्या नाबाद शतकाच्या जोरावर 3 बाद 227 धावा केल्या.आरसीबीनं 19 व्या ओव्हरमध्येच 4 बाद 230 धावा करत विजय मिळवला. आरसीबीनं त्यांच्या 18 वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या यशस्वीपणे पार केली. विराट कोहली आणि जितेश शर्माची कामगिरी बंगळुरुच्या विजयात महत्त्वाची ठरली. 

विराट कोहली आणि  जितेश शर्मा या दोघांनी केलेल्या अर्धशतकामुळं बंगळुरुनं विजयाच्या दिशेनं पावलं टाकलं. जितेश शर्मानं कर्णधारपदाला साजेसा खेळ केला. लखनौच्या गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी चांगली कामगिरी केली नाही त्यामुळं बंगळुरुनं विजयावर शिक्कामोर्तब केलं. जितेश शर्मा आणि मयंक अग्रवाल यांच्या शतकी भागीदारी आरसीबीला विजय मिळवून दिला. जितेश शर्मानं नाबाद 85 धावांची खेळी केली. यामुळं आरसीबीनं गुणतालिकेत टॉप 2 मध्ये स्थान मिळवलं 

जितेश शर्माला जीवदान  

जितेश शर्मा 49 धावांवर असताना तो दिग्वेश राठीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला होता. मात्र, दिग्वेश राठीचा पाय बाजूच्या रेषेला लागलेला असल्यानं फ्री हिट दिली गेली आणि जितेश शर्माला जीवदान मिळालं. विराट कोहली बाद झाल्यानंतर मयंक अग्रवाल आणि जितेश शर्मानं संघाला विजयाजवळ

रिषभ पंतचं शतक वाया

लखनौनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 3 बाद 227 धावा केल्या. रिषभ पंतच्या नाबाद 118 धावा आणि मिशेल मार्शच्या 67 धावा केल्या. या दोघांच्या खेळीमुळं लखनौनं 200 धावांचा टप्पा पार केला. ब्रीटझके यानं 14, निकोलस पूरन यानं 13 धावा केल्या. रिषभ पंतच्या शतकामुळं लखनौ सुपर जायंटसनं 3 बाद 227 धावा केल्या. मात्र,विराट कोहली, फिल सॉल्ट, मयंक अग्रवाल, जितेश शर्मा यांच्या दमदार फलंदाजीपुढं लखनौचे गोलंदाज अपयशी ठरले. विराट कोहलीनंतर जितेश शर्मानं षटकार चौकार मारत संघाला विजयाजवळ पोहोचवलं. लखनौचे फलंदाज अपयशी ठरल्यानं रिषभ पंतचं शतक वाया गेलं.  लखनौच्या गोलंदाजांची खराब कामगिरी आणि खराब क्षेत्ररक्षण त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. 

बंगळुरु टॉप 2 मध्ये  

बंगळुरुच्या विजयानं प्लेऑफमधील लढती ठरल्या आहेत. क्वालिफायर 1 मधील पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील मॅच 29 मे रोजी होणार आहे. तर, एलिमिनेटरमधील लढत मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये होणार आहे. एलिमिनेटर मधील विजेता संघ क्वालिफायर 1 च्या पराभूत संघासोबत क्वालिफायर 2 चा सामना खेळेल. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget