Royal Challengers Bangalore vs Chennai Super Kings IPL 2025 : गेल्या शनिवारी आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एक रोमांचक सामना खेळवला गेला. हा सामना खूपच रोमांचक झाला, जिथे आरसीबीने शेवटच्या चेंडूवर 2 धावांनी विजय मिळवला. चेन्नई आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे, पण आरसीबीने आता प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकले आहे. यादरम्यान, एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही लोक सीएसके चाहत्याला मारताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती धोनीचा मोठा चाहता दिसत आहे, त्याने आपल्या सरळ्या शरीरावर पिवळा रंग लावला आहे आणि त्यावर एमएस धोनीचा जर्सी नंबर देखील आहे. आधी, लोकांनी त्याचा विग काढून फेकून दिला आणि नंतर त्याला कानाखाली मारली. त्याच वेळी, सीएसकेची जर्सी घातलेले काही लोक त्या चाहत्याला घेऊन जाताना दिसले. यादरम्यान, एकजण येतो आणि डोक्यात हेल्मेट मारतो. व्हायरल व्हिडिओमध्ये अपशब्द देखील आहेत. दरम्यान, आरसीबी आणि सीएसके चाहत्यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये हाणामारी झाली. दरम्यान एका चाहत्याने म्हटले आहे की, सीएसकेच्या चाहत्याला मारहाण झालेला व्हिडिओ जुना आहे.

सीएसके बाहेर, आरसीबीला अजूनही आशा 

चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या या विजयासह आरसीबीचे प्लेऑफमधील स्थान जवळजवळ निश्चित झाले आहे. त्यांचे आता 16 गुण आहेत, सहसा इतक्या गुणांसह संघ प्लेऑफमध्ये पोहोचतो. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जला संपूर्ण हंगामात खेळलेल्या 11 सामन्यांमध्ये फक्त 2 विजय मिळवता आले आहेत आणि आता त्यांना अंतिम 4 मध्ये स्थान मिळवणे अशक्य आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली उत्तम फॉर्ममध्ये आहे आणि त्याने 505 धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. 

पाच वेळा विजेता चेन्नई सुपर किंग्ज या हंगामाच्या पहिल्या फेरीतच बाहेर पडला आहे. सलग दोन हंगामात सीएसके संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2024 मध्येही संघ पहिल्याच फेरीत बाहेर पडला होता. तर आयपीएलच्या इतिहासात पहिल्याच फेरीत बाहेर पडण्याची ही चौथी वेळ आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या या खराब कामगिरीचे कारण ते स्वतः आहे. मेगा लिलावात युवा खेळाडूंना प्राधान्य न देणे त्यांना महागात पडले. 

हे ही वाचा -

Mitchell Owen to Join PBKS : पंजाब किंग्सने ग्लेन मॅक्सवेलच्या जागी तगडा खेळाडू खरेदी केला; पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून भारतात आणला, किती कोटी रुपये दिले?