Gujarat Titans VS Delhi Capitals IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये टेबल टॉपर्सच्या लढतीत गुजरात टायटन्सने विजय मिळवला. शनिवार 19 एप्रिल रोजी अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने नंबर वन दिल्ली कॅपिटल्सचा 7 गडी राखून पराभव केला. यासह, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाने हंगामातील पाचवा विजय मिळवला. दिल्लीने दिलेले 204 धावांचे लक्ष्य गुजरातने शेवटच्या षटकात गाठले. या विजयाचे होरो जोस बटलर आणि प्रसिद्ध कृष्णा ठरले. कारण बटलरने 97 धावा केल्या, तर प्रसिद्धने 4 विकेट घेत दिल्लीला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर कडक उन्हात खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाहण्यासाठी आलेल्या हजारो गुजरात टायटन्स चाहत्यांची मेहनत व्यर्थ गेले नाही. दिल्ली कॅपिटल्सच्या कडक गोलंदाजीविरुद्ध यजमान संघाने चांगली कामगिरी केली आणि 204 धावांचे मजबूत लक्ष्य साध्य केले आणि पॉइंट्स टेबलमध्ये पहिले स्थान मिळवले.

यासामन्यात, दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात केली होती. दिल्लीचा कोणताही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही परंतु सलामीवीर अभिषेक पोरेल (18) आणि करुण नायर (31) आणि मधल्या फळीतील खेळाडू केएल राहुल (28), आशुतोष शर्मा (37) आणि ट्रिस्टन स्टब्स (31) यांनी योगदान दिले. एकेकाळी दिल्लीने फक्त 9 षटकांत 100 धावा केल्या होत्या पण प्रसिद्ध कृष्णा (4/41) आला आणि धावा रोखल्या. त्यानंतर दिल्लीचे फलंदाज काही मोठे षटके खेळताना दिसले पण विकेट पडतच राहिल्या. अशा परिस्थितीत दिल्लीला फक्त 203 धावाच करता आल्या.

बटलरने हुकले शतक, पण संघाचा विजय...   

दुसरीकडे, गुजरातची सुरुवात पूर्णपणे खराब झाली आणि कर्णधार शुभमन गिल दुसऱ्याच षटकात धावबाद झाला. पण त्याचा काही फरक पडला नाही कारण साई सुदर्शनने (36) आपले सातत्य कायम ठेवले आणि बटलरसोबत मिळून संघाला सात षटकांत 70 धावा केल्या. तो आऊट झाल्यानंतर, बटलरने जबाबदारी घेतली आणि त्याला शर्फान रदरफोर्डने त्याला साथ दिली. बटलरने हंगामातील तिसरे अर्धशतक झळकावले आणि रदरफोर्ड (43) सोबत मिळून 19 व्या षटकात संघाला 193 धावांपर्यंत पोहोचवले.

गुजरातला शेवटच्या षटकात 10 धावांची आवश्यकता होती आणि दिल्लीने पुन्हा एकदा मिशेल स्टार्कवर अवलंबून होती, ज्याने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 8 धावांचा बचाव केला होता. पण यावेळी राहुल तेवतियाने षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला आणि संघाला 7 विकेटने विजय मिळवून दिला. तथापि, बटलर त्याचे शतक पूर्ण करू शकला नाही आणि 54 चेंडूत 97 धावा (11 चौकार, 4 षटकार) करून नाबाद परतला.