IPL Orange Cap Winner : साई सुदर्शन ऑरेंज कॅपचा तर प्रसिद्ध कृष्णा पर्पल कॅपचा मानकरी, गुजरातच्या दोन्ही खेळाडूंचा झेंडा
IPL Orange Cap Winner : साई सुदर्शन आणि प्रसिद्ध कृष्णाला प्रत्येकी दहा लाखांचे बक्षीस मिळणार आहे.

Winner of Orange Cap and Purple Cap in IPL 2025 : आयपीएलच्या 18 व्या सिझनमध्ये बंगळुरूने 18 वर्षांनी अंतिम सामना जिंकत पंजाबचा सहा धावांनी विजय मिळवला. या स्पर्धेत गुजरात टायटन्सचा ओपनर फलंदाज साई सुदर्शन ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. साई सुदर्शनने 15 सामन्यात 54.21 च्या सरासरीने 759 धावा बनवल्या. तर सर्वाधिक 25 बळी घेऊन गुजरातच्या प्रसिद्ध कृष्णाने पर्पल कॅप मिळवली आहे. या दोघांनाही प्रत्येकी दहा लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.
IPL Orange Cap Winner : साई सुदर्शन ऑरेंज कॅपचा मानकरी
आयपीएलमध्ये संपूर्ण हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते. या हंगामात ऑरेंज कॅपसाठी अनेकजण स्पर्धेत होते. परंतु अंतिम सामन्यापूर्वी परिस्थिती जवळजवळ स्पष्ट झाली. साई सुदर्शनने शानदार फलंदाजी करत 54.21 च्या सरासरीने आणि 156.17 च्या स्ट्राईक रेटने 759 धावा केल्या. ऑरेंज कॅप जिंकण्यासोबतच त्याला 10 लाख रुपयांचे बक्षीसही मिळाले आहे.
Sai Sudharsan : ऑरेंज कॅप जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू
साई सुदर्शन ऑरेंज कप जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. साई सुदर्शनने या हंगामात एक शतक आणि सहा अर्धशतके केली आहेत. त्याचा सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या 108 धावा आहे. साई सुदर्शनच्या या कामगिरीमुळे गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. परंतु एलिमिनेटरमध्ये त्यांना मुंबई इंडियन्सविरुद्ध 20 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातही सलामीवीराने 50 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांसह 81 धावांची तुफानी खेळी केली. मात्र तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
IPL Orange Cap Winner : गुजरातच्या प्रसिद्ध कृष्णाला पर्पल कॅप
गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने पर्पल कॅप पटकावली आहे. त्याने 25 बळी घेतले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकवर चेन्नईच्या नूर अहमदचा नंबर लागतो. त्याने 24 बळी घेतले. ट्रेट बोल्टने 22 तर जोश हेजलवूडने 21 बळी घेतले आहेत. पर्पल कॅप मिळवणाऱ्या कृष्णाला 10 लाखांचे बक्षिस मिळणार आहे.
विराटची स्वप्नपूर्ती अन् बंगळुरूचा विजय
रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं पंजाबचा पराभव करुन पहिल्यांदाच आयपीएलचं विजेेतेपद पटकावलंय. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात बंगळुरुनं पंजाबचा 6 धावांनी पराभव केला. बंगळुरुनं दिलेल्या 191 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला 185 धावांचीच मजल मारता आली.
या विजयासह बंगळुरुचं आणि या संघाचा गेली 18 वर्ष भाग असणाऱ्या विराट कोहलीचं स्वप्न साकार झालं. कृणाल पंड्याने 4 षटकांत अवघ्या 17 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट्स घेतल्या. तर, रोमारियो शेफर्डने श्रेयस अय्यरला तंबूचा रस्ता दाखवला. त्याआधी कोहलीच्या 35 चेंडूंमधील 43 तर रजत पाटीदारच्या 16 चेंडूंमधील 26 धावांच्या खेळींनी आरसीबीच्या 190 च्या धावसंख्येत महत्त्वाचं योगदान दिलं.















