IPL vs PSL: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू कॉर्बिन बॉशला (Corbin Bosch) पाकिस्तान सुपर लीग (PSL) मधून एका वर्षासाठी बंदी घातली आहे. कॉर्बिन बॉशने पीएसएल कराराकडे दुर्लक्ष करून आयपीएल 2025 मध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला पीसीएलमधून एका वर्षासाठी बंदी घातली आहे. पीएसएलची स्पर्धा आजपासून म्हणजेच 11 एप्रिलपासून रंगणार आहे. आज इस्लामाबाद युनायटेड आणि लाहोर कलंदर्स यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. 

कॉर्बिन बॉशने पीएसएलऐवजी आयपीएलमध्ये खेळणे पसंत केले, त्यानंतर पीसीबीने त्याच्याविरुद्ध कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप करत कायदेशीर नोटीस बजावली. यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूवर फारसा फरक पडणार नाही, कारण त्याला पीएसएलपेक्षा आयपीएलमध्ये जास्त पैसे मिळत आहेत. पाकिस्तान निश्चितच त्याबाबत बीसीसीआयच्या रडारवर असेल. यावर्षी आयपीएल आणि पीएसएल जवळजवळ एकाच वेळी आयोजित केले जात आहेत. पीसीबीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कॉर्बिन बॉश या अष्टपैलू खेळाडूवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे आणि तो पुढील वर्षी होणाऱ्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्यासाठी निवडीसाठी पात्र राहणार नाही.

कॉर्बिन बॉश काय म्हणाला?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एका वर्षांसाठी बंदी घातल्यानंतर मी पेशावर झाल्मीच्या निष्ठावंत चाहत्यांची माफी मागतो. मी जे काही केले त्याची मी पूर्ण जबाबदारी घेतो आणि मी शिक्षा देखील स्वीकारतो, ज्यामध्ये दंड आणि पीएसएलमधून एक वर्षाची बंदी समाविष्ट आहे. 

मुंबई इंडियन्सने 75 लाख रुपयांत केले होते खरेदी-

आयपीएलच्या लिलावात मुंबई इंडियन्सने कॉर्बिन बॉशला 75 लाख रुपयांत खरेदी केले होते. दुसरीकडे, पीएसएलमध्ये खेळण्यासाठी त्याला ५०-७५ लाख रुपये मिळणार होते. दरम्यान, कॉर्बिन बॉशला आतापर्यंत आयपीएल 2025 मध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.

संबंधित बातमी:

IPL 2025 RCB vs LSG KL Rahul: मी इकडचा जयकांत शिकरे...; केएल राहुलचं न पाहिलेलं सेलिब्रेशन, आरसीबीविरुद्ध सामना जिंकताच काय केलं?, VIDEO

Virat Kohli-Rajat Patidar IPL 2025: कोहली कर्णधार पाटीदारवर संतापला; थेट दिनेश कार्तिकला जाऊन भेटला, दोघं समोर येताच...VIDEO