एक्स्प्लोर

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सनं चारवेळा एलिमिनेटरचे सामने खेळले, MI चं जुनं रेकॉर्ड पाहून चाहत्यांची धाकधूक वाढणार

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सनं आयपीएलमध्ये प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई इंडियन्स गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असल्यानं त्यांना एलिमिनेटरचा सामना करावा लागेल.

मुंबई : हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सनं  आयपीएलच्या 18 व्या हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या या पर्वाची सुरुवात चांगली झाली नव्हती. मात्र, मुंबई इंडियन्सनं कमबॅक करत प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. पंजाब किंग्ज विरुद्ध झालेल्या पराभवामुळं मुंबई इंडियन्स गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. मुंबई चौथ्या स्थानावर असल्यानं त्यांना प्लेऑफमध्ये एलिमिनेटरचा सामना खेळावा लागेल. मुंबई विरुद्ध एलिमिनेटरचा सामना कोण खेळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मुंबई इंडियन्सनं यापूर्वी चार एलिमिनेटरचे सामने खेळले आहेत. त्यामध्ये काय घडलेलं यासंदर्भातील रेकॉर्ड कॅप्टन हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचं टेन्शन वाढू शकतं. 

आयपीएलच्या गुणतालिकेत 10 संघांपैकी  पहिले चार संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करतात. पहिल्या दोन संघांमध्ये क्वालिफायर 1 चा सामना होतो. तर, एलिमिनेटरचा सामना तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या संघात होतो. एलिमिनेटरचा सामना जो संघ जिंकतो तो संघ क्वालिफायर 2 चा सामना खेळतो. क्वालिफायर 2 मधील दुसरा संघ हा पहिल्या क्वालिफायरमधील पराभूत संघ असतो. क्वालिफायर 1 आणि क्वालिफायर 2 हे सामने जिंकणारे संघ अंतिम फेरीत प्रवेश करतात. सध्या क्वालिफायर 1 मधील एक संघ निश्चित झाला आहे. पंजाब किंग्ज सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सच्या पुढं असल्यानं क्वालिफायर 1 चा सामना खेळणार हे निश्चित झालं आहे. तर, मुंबई इंडियन्स एलिमिनेटरचा सामना खेळणार आहे हे निश्चित आहे. 

एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्स खेळणार हे निश्चित झालं आहे. दुसरा संघ कोणता असेल हे आज निश्चित होईल. मात्र, एलिमिनेटर सामना खेळणाऱ्या दोन पैकी एका संघाला सलग तीन सामने जिंकल्यास तो आयीएलचं विजेतेपद मिळवू शकतो. एलिमिनेटरचा सामना जिंकणारा संघ क्वालिफायर 2 चा सामना खेळेल. तर, एलिमिनेटरच्या लढतीत जो पराभूत होईल त्या संघाचा प्रवास समाप्त होईल.  

हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सनं आयपीएलमध्ये प्लेऑफमध्ये पहिल्यांदा प्रवेश केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मुंबईनं पाचवेळा विजेतेपद मिळवलं आहे. तर, 10 व्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सनं 2013 च्या हंगामात विजेतेपद मिळवलं होतं. 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये विजेतेपद मिळवलं होतं. या सर्व हंगामामध्ये मुंबई इंडियन्स गुणतालिकेत टॉप 2 मध्ये होते. 


मुंबई इंडियन्स पहिल्यांदा आयपीएल फायनमध्ये 2010 ला पोहोचली होती. त्यावेळी सचिन तेंडुलकरच्या नेतृत्त्वात मुंबई गुणतालिकेत पहिल्या स्थानावर होती. मात्र, चेन्नई सुपर किंग्जनं त्यांना अंतिम फेरीत पराभूत केलं. मुंबई इंडियन्सनं 2011, 2012, 2014 आणि 2023 मध्ये प्लेऑफमध्ये धडक दिली होती. मात्र, त्यावेळी मुंबई गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर होती. मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळालं नव्हतं. 

  • 2011 मध्ये मुंबई इंडियन्सनं एलिमिनेटरमध्ये  क्वालिफायर दोनमध्ये धडक दिली होती, त्या सामन्यात मुंबई पराभूत झाली.
  • 2012 मध्ये मुंबई इंडियन्सचा एलिमिनेटरमध्ये पराभव झाला होता.  
  • 2014 मध्ये MI  एलिमिनेटरमध्ये पराभूत झाली.
  • 2023 मध्ये MI एलिमिनेटर मॅच जिंकली मात्र क्वालिफायर  2 मध्ये पराभूत झाली होती. 
      

मुंबई इंडियन्सनं आयपीएलमध्ये चारवेळा एलिमिनेटरचे सामने खेळले. त्यात त्यांना दोन वेळा पराभव स्वीकारावा लागला, तर दोनवेळा क्वालिफायर 2 मध्ये पराभव स्वीकारावा लागला.  एलिमिनेटरचा सामना 30  मे रोजी मुल्लानूपर क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. मुंबई इंडियन्स सोबत कोण लढणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. लखनौ आणि आरसीबी यांच्यातील निकालानंतर हे निश्चित होईळ. आरसीबी जिंकल्यास गुजरात एलिमिनेटर खेळेल. आरसीबी पराभूत झाल्यास ते एलिमिनेटर खेळतील. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL Black Magic : आयपीएलमध्ये काळी जादू, लिंबू अन् जादूटोणा? काय आहे प्रकरण? 
आयपीएलमध्ये काळी जादू, लिंबू अन् जादूटोणा? काय आहे प्रकरण? 
GT vs MI Live Score IPL 2026 : तिलक वर्माचे झंझावाती शतक! मुंबई इंडियन्सचे गुजरात टायटन्ससमोर 200 धावांचे तगडे आव्हान
GT vs MI Live Updates : तिलक वर्माचे झंझावाती शतक! मुंबई इंडियन्सचे गुजरात टायटन्ससमोर 200 धावांचे तगडे आव्हान
Suryakumar Yadav GT vs MI IPL 2026 : सूर्याचा मावळतीचा काळ सुरू? रबाडाच्या मिसाईलने दांड्या उडवल्या; स्वत: चिंगम चावत बघत बसला, नेमकं काय घडलं?, पाहा Video
सूर्याचा मावळतीचा काळ सुरू? रबाडाच्या मिसाईलने दांड्या उडवल्या; स्वत: चिंगम चावत बघत बसला, नेमकं काय घडलं?, पाहा Video
Who is Danish Malewar : बापाचं स्वप्न आणि विदर्भाची शान! कोण आहे दानिश मालेवार? ज्याने मुंबईच्या संघात थेट रोहित शर्माची जागा घेतली
बापाचं स्वप्न आणि विदर्भाची शान! कोण आहे दानिश मालेवार? ज्याने मुंबईच्या संघात थेट रोहित शर्माची जागा घेतली

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
Tushar Doshi : मोठी बातमी : साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली, एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड
साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली, एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड
Embed widget