एक्स्प्लोर

Australian Players In IPL 2025 : आयपीएल सोडून कांगारू संघाचे एका पाठोपाठ एक खेळाडू मायदेशी! ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय, पुन्हा भारतात पाठवणार?

IPL 2025 Cricket Australia : भारत-पाकिस्तान तणावामुळे थांबलेला इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा हंगाम 17 मे पासून पुन्हा सुरू होत आहे.

IPL 2025 Update News : भारत-पाकिस्तान तणावामुळे थांबलेला इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा हंगाम 17 मे पासून पुन्हा सुरू होत आहे. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात बंगळुरूमध्ये खेळला जाणार आहे. पण उर्वरित सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात परततील का, हा एक मोठा प्रश्न होता. कारण 11 जूनपासून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामनाही खेळवला जाणार आहे. त्याआधी आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यावर अधिकृत निवेदन जारी केले आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अधिकृत निवेदन जारी करून म्हटले आहे की, "खेळाडूंना भारतात परतायचे की नाही या त्यांच्या वैयक्तिक निर्णय आहे आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्यांचे समर्थन करेल." पंजाब किंग्जकडे सध्या सर्वाधिक ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत. पंजाबसह, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंची कामगिरी या हंगामात उत्कृष्ट राहिली आहे. त्यामुळे जर ते आले नाही तर संघाच्या विजय किंवा पराभवावर परिणाम करू शकते.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया काय म्हणाली? 

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुढे म्हटले आहे की, "आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये जाणाऱ्या खेळाडूंसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची तयारी करण्यासाठी संघ व्यवस्थापन काम करेल. सुरक्षा व्यवस्था आणि सुरक्षिततेबाबत आम्ही ऑस्ट्रेलियन सरकार आणि बीसीसीआयच्या संपर्कात आहोत."

जोश हेझलवूड आरसीबीकडून खेळतो, पण खांद्याच्या दुखापतीमुळे तो त्रस्त आहे आणि त्याला भारतात परतणे कठीण आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आशा आहे की तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी तंदुरुस्त होईल. स्टार्क भारतात परतणार नाही अशीही बातमी आहे. मिचेल स्टार्क, जेक फ्रेझर-मॅकगर्क (डीसी), स्पेन्सर जॉन्सन (केकेआर), मिचेल मार्श (एलएसजी), जोश हेझलवूड, टिम डेव्हिड (आरसीबी), मार्कस स्टोइनिस, मिच ओवेन, जोश इंग्लिस, आरोन हार्डी, झेवियर बार्टलेट (पीबीकेएस) यांचा समावेश आहे.

आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक

17 मे: आरसीबी विरुद्ध केकेआर (बंगळुरू)
18 मे: आरआर विरुद्ध पीबीकेएस (जयपूर)
18 मे: डीसी विरुद्ध जीटी (दिल्ली)
19 मे: एलएसजी विरुद्ध एसआरएच (लखनऊ)
20 मे: सीएसके विरुद्ध आरआर (दिल्ली)
21 मे: एमआय विरुद्ध डीसी (मुंबई)
22 मे: जीटी विरुद्ध एलएसजी (अहमदाबाद)
23 मे: आरसीबी विरुद्ध एसआरएच (बंगळुरू)
24 मे: पीबीकेएस विरुद्ध डीसी (जयपूर)
25 मे: जीटी विरुद्ध सीएसके (अहमदाबाद)
25 मे: एसआरएच विरुद्ध केकेआर (दिल्ली)
26 मे: पीबीकेएस विरुद्ध एमआय (जयपूर)
27 मे: एलएसजी विरुद्ध आरसीबी (लखनऊ)

आयपीएल 2025 प्लेऑफ सामन्यांचे वेळापत्रक

29 मे: क्वालिफायर 1 (स्थळ निश्चित नाही)
30 मे: एलिमिनेटर (स्थळ निश्चित नाही)
1 जून: क्वालिफायर 2 (स्थळ निश्चित नाही)
3 जून: अंतिम (स्थळ निश्चित नाही)

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Election 2026: 'आप'च्या उमेदवारावर रोखलेली 'ती' बंदूक नव्हे तर लायटर; परस्पर विरोधी गुन्हा दाखल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
'आप'च्या उमेदवारावर रोखलेली 'ती' बंदूक नव्हे तर लायटर; परस्पर विरोधी गुन्हा दाखल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
तोपर्यंत बिनविरोध नगरसेवकांवर स्थगिती कायम ठेवावी; अविनाश जाधवांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी
तोपर्यंत बिनविरोध नगरसेवकांवर स्थगिती कायम ठेवावी; अविनाश जाधवांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी
Ajit Pawar Pune Metro: पुणे मेट्रो मोफत करण्यावरुन फडणवीसांनी खिल्ली उडवली, अजितदादांनी प्लॅनच सांगितला
पुणे मेट्रो मोफत करण्यावरुन फडणवीसांनी खिल्ली उडवली, अजितदादांनी प्लॅनच सांगितला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी अदानींचा वकिल नाही, पण...; राज ठाकरेंचा पुन्हा पलटवार, एकच उद्योगपती एवढा मोठा कसा?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी अदानींचा वकिल नाही, पण...; राज ठाकरेंचा पुन्हा पलटवार, एकच उद्योगपती एवढा मोठा कसा?

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Election 2026: 'आप'च्या उमेदवारावर रोखलेली 'ती' बंदूक नव्हे तर लायटर; परस्पर विरोधी गुन्हा दाखल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
'आप'च्या उमेदवारावर रोखलेली 'ती' बंदूक नव्हे तर लायटर; परस्पर विरोधी गुन्हा दाखल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
तोपर्यंत बिनविरोध नगरसेवकांवर स्थगिती कायम ठेवावी; अविनाश जाधवांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी
तोपर्यंत बिनविरोध नगरसेवकांवर स्थगिती कायम ठेवावी; अविनाश जाधवांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी
Ajit Pawar Pune Metro: पुणे मेट्रो मोफत करण्यावरुन फडणवीसांनी खिल्ली उडवली, अजितदादांनी प्लॅनच सांगितला
पुणे मेट्रो मोफत करण्यावरुन फडणवीसांनी खिल्ली उडवली, अजितदादांनी प्लॅनच सांगितला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी अदानींचा वकिल नाही, पण...; राज ठाकरेंचा पुन्हा पलटवार, एकच उद्योगपती एवढा मोठा कसा?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी अदानींचा वकिल नाही, पण...; राज ठाकरेंचा पुन्हा पलटवार, एकच उद्योगपती एवढा मोठा कसा?
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदार सतेज पाटलांचा व्हिडिओ बॉम्ब; मतदानापूर्वी कोल्हापूरच्या सत्ताधारी आमदाराने 40 लाख रुपये घेतल्याचा आरोप करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ जारी
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदार सतेज पाटलांचा व्हिडिओ बॉम्ब; मतदानापूर्वी कोल्हापूरच्या सत्ताधारी आमदाराने 40 लाख रुपये घेतल्याचा आरोप करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ जारी
अभिनेत्री किशोरी शहाणेच्या कारला धडक; ठाणे-मुंबई मार्गावर नेमकं काय घडलं? VIDEO शेअर करत संताप व्यक्त
अभिनेत्री किशोरी शहाणेच्या कारला धडक; ठाणे-मुंबई मार्गावर नेमकं काय घडलं? VIDEO शेअर करत संताप व्यक्त
लाडक्या बहिणींनो बँक खातं चेक करा, संक्रांतीआधीच पैसे जमा झाले; आचारसंहितेच्या कात्रीतून सुटका
लाडक्या बहिणींनो बँक खातं चेक करा, संक्रांतीआधीच पैसे जमा झाले; आचारसंहितेच्या कात्रीतून सुटका
जिथं जिथं निवडणुका तिथं तिथं ईडी फाईल उघडली, पश्चिम बंगालपूर्वी 3 राज्यांमध्ये सेम पॅटर्न; महाराष्ट्र, दिल्ली झारखंडनंतर तामिळनाडू, आसाम, केरळ, पुद्दुचेरीत छापेमारी
जिथं जिथं निवडणुका तिथं तिथं ईडी फाईल उघडली, पश्चिम बंगालपूर्वी 3 राज्यांमध्ये सेम पॅटर्न; महाराष्ट्र, दिल्ली झारखंडनंतर तामिळनाडू, आसाम, केरळ, पुद्दुचेरीत छापेमारी
Embed widget