IPL 2024 SRH vs MI Match Highlights: आयपीएलच्या 17 व्या हंगामात मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव झाला आहे. हैदराबादने दिलेल्या 278 धावांच्या विराट आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने 5 बाद 246 धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादने मुंबईचा 31 धावांनी पराभव करत यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली. तिलक वर्माचा अपवाद वगळता मुंबईकडून एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. तिलक वर्माने एकाकी झुंज दिली. तिलक वर्माने 64 धावांची खेळी केली. हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्स याने भेदक मारा करत दोन महत्वाच्या विकेट घेतल्या.
मुंबईची आक्रमक सुरुवात -
हैदराबादने दिलेल्या 278 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने शानदार सुरुवात केली. ईशान किशन आणि रोहित शर्मा यांनी वादळी फलंदाजी केली. दोघांनी 3.2 षटकांमध्ये 56 धावांची सलामी दिली. ईशान किशन 13 चेंडूमध्ये 34 धावांचं योगदान दिले. किशनने आपल्या खेळीमध्ये चार षटकार आणि दोन चौकार लगावले. ईशान बाद झाल्यानंतर रोहित शर्माने फटकेबाजी केली. रोहित शर्माने चौफेर टोलेबाजी करत मुंबईची धावसंख्या हालती ठेवली. रोहित शर्माने 12 चेंडूमध्ये तीन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 26 धावांची केळी केली. मुंबई इंडियन्सने सहा षटकांमध्ये 76 धावा चोपल्या.
तिलक वर्माची एकाकी झुंज -
तिलक वर्मा याने मुंबईकडून एकाकी झुंज दिली. तिलक वर्माने हैदराबादच्या गोलंदाजाचा समाचार घेतला. तिलक वर्मा मैदानावर होता, तोपर्यंत मुंबईच्या विजयाच्या आशा जिवंत होत्या. तिलक वर्माने 34 चेंडूमध्ये 64 धावांचा पाऊस पाडला. तिलक वर्माने आपल्या खेळीला 6 षटकार आणि दोन चौकारांचा साज होता. तिलक वर्माने नमन धीर याच्यासोबत 37 चेंडूमध्ये 84 धावांची भागिदारी केली.
हार्दिक पांड्याची संथ खेळी -
278 धावांच्या आव्हनाचा पाठलाग करताना हार्दिक पांड्याने संथ फलंदाजी केली. हार्दिक पांड्याने मोक्याच्या क्षणी वेगानं फलंदाजी केली नाही. हार्दिक पांड्याने षटकार मारत इरादे स्पष्ट केले, पण त्याला प्रभावी फलंदाजी करता आली नाही. हार्दिक पांड्याने 20 चेंडूमध्ये फक्त 24 धावाच करता आल्या. हार्दिक पांड्याने आपल्या खेळीमध्ये एक चौकार आणि एक षटकर ठोकला.
मुंबईच्या या फलंदाजांनी केला प्रतिकार -
नमन धीर, टीम डेविड आमि शेफर्ड यांनी वेगाने धावसंख्या करत मुंबईची धावसंख्या वाढवली. नमन धीर याने 14 चेंडूमध्ये 2 चौकार आणि 2 षटकार मारत 30 धावांचे योगदान दिले. तर दुसरीकडे टीम डेविड याने 22 चेंडूमध्ये 42 धावांचे योगदान दिले. डेविडने आपल्या खेळीमध्ये 3 षटकार आणि दोन चौकार ठोकले. शेफर्ड याने 6 चेंडूमध्ये 15 धावांची खेळी केली, यामध्ये एक षटकार आणि दोन चौकार लगावले.
कमिन्सचा भेदक मारा -
पॅट कमिन्स याने कर्णधाराला साजवेल अशी कामगिरी केली. पॅट कमिन्स याने मुंबईच्या महत्वाच्या दोन फलंदाजांना माघारी झाडत हैदराबादच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. कमिन्सने धोकादायक रोहित शऱ्मा आणि तिलक वर्मा यांना बाद केले. कमिन्सने 4 षटकांमध्ये 35 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमारने 4 षटकामध्ये 53 धावा खर्च केल्या. जयदेव उनादकट याने 4 षटकात 47 धावा देत दोन विकेट घेतल्या. शाहबाद अहमद याने एक विकेट घेतली.