IPL 2024 SRH vs GT: आज सनरायझर्स हैदराबाद अन् गुजरात टायटन्स यांच्यात होणार सामना

IPL 2024 SRH vs GT: हैदराबादमधील राजीव गांधी मैदानावर हा सामना रंगेल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 

मुकेश चव्हाण Last Updated: 16 May 2024 10:28 PM
सामना पावसामुळे रद्द, हैदराबादचा प्लेऑफमध्ये प्रवेश, दिल्ली-लखनौचं आव्हान संपलं

सामना पावसामुळे रद्द, हैदराबादचा प्लेऑफमध्ये प्रवेश, दिल्ली-लखनौचं आव्हान संपलं

पावसाचा जोर वाढला

हैदराबादमध्ये पावसाचा जोर वाढलाय. हैदराबाद आणि गुजरात यांच्यातील सामना रद्द होण्याची शक्यता... 

पावसाचा धुमाकूळ, सामन्याला उशीर

हैदराबादमध्ये मुसळधार पावसाची हजेरी

हैदराबादमध्ये मुसळधार पावसाची हजेरी.. नाणेफेकीला अद्याप विलंब

हैदराबादमध्ये पुन्हा एकदा पावसाची हजेरी

हैदराबादमध्ये पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नाणेफेकीला उशीर होणार आहे.

पाऊस थांबला

हैदराबादमध्ये पावसाने विश्रांती घेतली. थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होणार आहे. 

नाणेफेक उशीराने

पावसाच्या व्यत्ययामुळे हैदराबाद आणि गुजरात यांच्यातील सामना उशीराने सुरु होण्याची शक्यता.. नाणेफेक उशीराने होणार

हैदराबादमध्ये मुसळधार पाऊस

हैदाराबाद आणि गुजरात यांच्यातील सामना रद्द होण्याची शक्यता आहे. हैदराबादमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. 





गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ

रिद्धिमान साहा(w), शुभमन गिल(c), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा, संदीप वॉरियर, साई सुधरसन, शरथ बीआर, मानव सुथार, विजय शंकर, दर्शन नळकांडे, मॅथ्यू वेड, उमेश यादव, केन विल्यमसन, जयंत यादव, अभिनव मनोहर, जोशुआ लिटल, कार्तिक त्यागी, स्पेन्सर जॉन्सन, सुशांत मिश्रा

सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (W), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (C), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन, अनमोलप्रीत सिंग, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, उमरान मलिक, मयंक मार्कंडे, राहुल त्रिपाठी, मयंक अग्रवाल, उपेंद्र यादव, झटावेध सुब्रमण्यन, सनवीर सिंग, विजयकांत व्यासकांत, फजलहक फारुकी, मार्को जानसेन, आकाश महाराज सिंग 

पार्श्वभूमी

IPL 2024 Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans: आज सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात सामना होणार आहे. हैदराबादमधील राजीव गांधी मैदानावर हा सामना रंगेल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.