बंगळुरु : आयपीएलच्या 17 (IPL 2024) व्या पर्वातील सहाव्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (Royal Challengers Bengaluru) पंजाब किंग्ज (Punjab Kings) ला चार विकेटनं पराभूत केलं.  शिखर धवननं चिन्नास्वामी स्टेडियमवरील मॅचनंतर संवाद साधताना मॅच नेमकी कुठं हातातून निसटली यासंदर्भातील दोन गोष्टी सांगितल्या. 


आरसीबीनं टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. आरसीबीच्या बॉलर्सनं पंजाब किंग्जला सुरुवातीच्या पॉवर प्लेमध्ये वेगानं धावा काढू दिल्या नाहीत. शिखर धवननं 37 बॉलमध्ये 45 धावा केल्या. यामध्ये त्यानं 5 चौकार आणि एक षटकार मारला. याशिवाय प्रभासिमरन सिंग 25, लिव्हिंगस्टोन 17, सॅम करन 23 आणि जितेश शर्मानं  27 धावा केल्या. अखेरच्या ओव्हर्समध्ये शशांक सिंगनं 8 बॉलमध्ये 21 धावा केल्यानं पंजाबनं 6 विकेटवर 176 धावा केल्या. आरसीबीनं हे आव्हानं 20 व्या ओव्हर्समध्ये चार विकेट राखून मिळवला.


शिखर धवननं दुसऱ्या मॅचमधील पराभवासोबत बोलताना म्हटल, की आम्ही पॉवर प्लेचा चांगला वापर करु शकलो नाही. पंजाब किंग्जनं पॉवर प्लेमध्ये अजून 10 ते 15 धावा करायला हव्या होत्या.  शिखर धवन म्हणाला की मॅच चांगली झाली पण आम्ही कमबॅक केलं होत पण पराभूत झालो. आम्ही पहिल्या सहा ओव्हर्समध्ये 10  ते 15 धावा करण्यास कमी पडलो. त्या 10 ते 15 धावा आणि आमच्या संघानं जे कॅच सोडले ते देखील महागात पडले, असं शिखर धवन म्हणाला. 


शिखर धवननं पराभवाचं खापर कुणावर फोडलं?


शिखर धवननं मॅचच्या टर्निंग पॉईंटबद्दल बोलताना विराट कोहलीचा कॅच सोडणाऱ्या जॉनी बेअयरस्टोला जबाबदार धरलं. विराट कोहलीनं 70 हून अधिक धावा केल्या, आम्ही त्याचा कॅच सोडला आणि ते आम्हाला महागात पडलं. आम्ही जर तो कॅच घेऊ शकलो असतो तर दुसऱ्या बॉलपासून आमची बाजू वरचढ ठरली असती. मात्र, आम्ही ती संधी गमावली आणि त्याची किंमत मोजली असं शिखर धवन म्हणाला.


शिखर धवननं पोस्ट मॅच प्रेझेंटशनच्यावेळी बोलताना म्हटलं की आम्ही नियमित अंतरानं विकेट गमावल्या. यामुळं आमच्यावर दबाव येत गेला. ही मॅच अखेरच्या ओव्हरपर्यंत गेली. आमच्या बॉलर्सना देखील अजून चांगली कामगिरी करता आली असती, असं देखील धवननं म्हटलं. यावेळी शिखर धवननं पंजाब किंग्जचा स्पिनर हरप्रीत ब्रारचं कौतुक केलं. हरप्रीत ब्रारनं 4 ओव्हर्समध्ये 13 धावा देत 2 विकेट घेतल्याचं त्यानं म्हटलं.  


दरम्यान, आयपीएलच्या सहा सामन्यानंतर राजस्थान रॉयल्स एका विजयासह नेट रनरेटच्या जोरावर पहिल्या स्थानावर आहे. तर, दुसऱ्या स्थानी चेन्नई सुपर किंग्ज असून पंजाब किंग्ज पाचव्या तर आरसीबी सहाव्या स्थानावर आहे. 


संबंधित बातम्या : 


 Virat Kohli Video Calls : आरसीबीचा होम ग्राऊंडवर पहिला विजय, विराट कोहलीचं घरच्यांसोबत सेलिब्रेशन, अनुष्का शर्मासह मुलांना व्हिडीओ कॉल


रनमशीन कोहलीचा पंजाबविरोधात विराट विक्रम, असा पराक्रम करणारा आशियातील पहिलाच खेळाडू