जयपूर : आयपीएलमध्ये (IPL 2024) मध्ये आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात 24 वी मॅच होणार आहे. या मॅचमध्ये संजू सॅमसनच्या नेतृत्त्वातील राजस्थान रॉयल्स आणि शुभमन गिल याच्या नेतृत्त्वातील गुजरात टायटन्स आमने सामने येणार आहेत. राजस्थान रॉयल्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या सलग चार मॅचमध्ये विजय मिळवला आहे. दुसरीकडे गुजरात टायटन्सला पहिल्या पाच पैकी तीन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. तर, दोन सामन्यांमध्ये गुजरातनं विजय मिळवला आहे. गुजरातनं मुंबई इंडियन्सला पराभूत करुन यंदाच्या आयपीएलची विजयानं सुरुवात केली होती. मात्र, नंतर त्यांना तीन वेळा पराभव स्वीकारावा लागला.  गुजरातनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं राजस्थान रॉयल्स पहिल्यांदा फलंदाजी करणार आहे.


राजस्थान रॉयल्स पाचवा विजय मिळवणार? 


संजू सॅमसन याच्या नेतृत्त्वातील राजस्थान रॉयल्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या चार मॅचमध्ये विजय मिळवला आहे. राजस्थान रॉयल्स सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे गुजरात टायटन्स पाच पैकी दोन मॅचमध्ये विजय मिळवत चार गुणांच्या आधारे सध्या सातव्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्स यंदाच्या आयपीएलमध्ये अपराजित आहे. कॅप्टन संजू सॅमसन आणि जोस बटलर हे दोघे फॉर्ममध्ये आहेत. ट्रेंट बोल्टची बॉलिंग देखील राजस्थानसाठी गेमचेंजर ठरत आहे. 


गुजरात टायटन्स कमबॅक करणार? 


गुजरात टायटन्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये पाचपैकी तीन मॅचमध्ये पराभव स्वीकारला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्त्वातील टीमला आजच्या मॅचमध्ये विजय मिळवणार का हे पाहावं लागेल. शुभमन गिलला पंजाब किंग्ज विरुद्ध सूर गवसला होता. मात्र, त्या मॅचमध्ये गुजरातला पराभव स्वीकारावा लागला. लखनौ सुपर जाएंटस विरोधातील पराभवानंतर आज गुजरात टायटन्स कमबॅक करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. 


गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यापूर्वी पाचवेळा आमने सामने आले आहेत. या पाचपैकी चार मॅचमध्ये गुजरातनं राजस्थानला पराभत केलं आहे. दुसरीकडे राजस्थाननं गुजरातला केवळ एका मॅचमध्ये पराभूत केलं आहे. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये चित्र वेगळं आहे. राजस्थान रॉयल्सनं पहिल्या चार मॅचमध्ये विजय मिळवला आहे. राजस्थानचा विजयरथ रोखण्याचं आव्हान गुजरात टायटन्स पुढं असेल. 


गुजरातची टीम :


रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल(कर्णधार), केन विलियमन्सन,  साई सुदर्शन, विजय शंकर, राहुल तेवातिया, अझमतुल्लाह ओमरझई, राशिद खान, नूर अहमद, उमेश यादव, दर्शन नाळखंडे


राजस्थानची टीम


यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर / कर्णधार) रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन,युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर 


संबंधित बातम्या :


MS Dhoni : महेंद्रसिंह धोनीच्या कसोटीतील तडकाफडकी निवृत्तीचं गुपित समोर, पत्नी साक्षीनं कारण सांगितलं, व्हिडीओ व्हायरल


Rohit Sharma : मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माचा तो व्हिडीओ शेअर केला अन् अफवांचं पेव फुटलं, काय घडलं?