IPL 2024 Playoffs Fixtures: 22 मार्च 2024 रोजी आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात झाली होती. जवळपास दोन महिन्यानंतर यंदाच्या हंगामातील प्लेऑफचे चार संघ स्पष्ट झाले आहे. कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानावर आहे, तर आरसीबी चौथ्या क्रमांकावर आहे. 21 मे 2024 पासून प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. आयपीएल प्लेऑफचे सामन्याबाबत सर्व माहिती, वेळापत्रक जाणून घेऊयात...
प्लेऑफचं वेळापत्रक काय आहे ?
प्लेऑफचे सामने 21 मे पासून सुरु होणार आहेत. तर फायनलची लढत 26 मे रोजी होणार आहे. क्वालिफायर 1 आणि एलिमेनटर हे दोन सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत. तर क्वालिफायर 2 आणि फायनलचा सामना चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर पार पडणार आहे. क्वालिफायर 1 सामना 21 मे रोजी, तर एलिमेनटरचा सामना 22 मे रोजी होणार आहे. तर क्वालिफायर 2 24 आणि फायनल 26 मे रोजी होणार आहे.
सामना |
तारीख |
प्रतिस्पर्धी संघ |
प्रतिस्पर्धी संघ |
कोणतं मैदान ? |
क्वालिफायर-1 Qualifier 1 |
21 मे 2024 |
कोलकाता नाईट रायडर्स Kolkata Knight Riders |
सनरायजर्स हैदराबाद Sunrisers Hyderabad |
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद Narendra Modi Stadium, Ahmedabad |
एलिमेनटर Eliminator |
22 मे 2024 |
राजस्थान रॉयल्स Rajasthan Royals |
आरसीबी Royal Challengers Bangalore |
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद Narendra Modi Stadium, Ahmedabad |
क्वालिफायर-2 Qualifier 2 |
24 मे 2024 |
क्वालिफायर-1 मधील पराभूत संघ LOSER Q1 |
एलिमेनटरमधील विजेता संघ WINNER ELIMINATOR |
एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई MA Chidambaram Stadium, Chennai |
Final |
26 मे 2024 |
क्वालिफायर-1 मधील विजेता संघ WINNER Q1
|
क्वालिफायर-2 मधील विजेता संघ WINNER Q2 |
एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई MA Chidambaram Stadium, Chennai |
प्लेऑफमध्ये पोहचणाऱ्या चार संघाचा प्रवास -
कोलकाता नाईट रायडर्स -
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने शानदार कामगिरी केली. कोलकात्याने सांघिक कामगिरीच्या जोरावर स्पर्धेत वर्चस्व गाजवलं. नारायण राणा, फिलिप सॉल्ट, श्रेयस अय्यर, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा यांनी शानदार कामगिरी केली. कोलकाताने 14 सामन्यात 20 गुणांची कमाई केली.
हैदराबादचा प्रवास -
आयपीएल 2024 मधील अखेरच्या साखळी सामन्यात पंजाबचा पराभव करत प्लेऑफमधील स्थान निश्चित केले. हैदराबादने 14 सामन्यात 8 विजय मिळवले, एक सामना पावसामुळे रद्द झाला. हैदराबादच्या नावावर 14 सामन्यात 17 गुण आहेत. हैदराबादचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
राजस्थान रॉयल्स -
राजस्थान रॉयल्सने पहिल्या हापमध्ये शानदार कामगिरी केली. एकापाठोपाठ एक सामन्यात सहज विजय मिळवला. पण दुसऱ्या हापमध्ये राजस्थानचा संघ ढेपाळला. सलग चार सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थानचा अखेरचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे एक एक गुण देण्यात आला. राजस्थानचे 14 सामन्यात 17 गुण झाले आहेत. ते गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेत.
आरसीबी चौथा संघ -
आयपीएल 2024 ची सुरुवात अतिशय खराब झाली. पहिल्या आठ सामन्यात आरसीबीने सात सामने गमावले होते. आरसीबी यंदा प्लेऑफमध्ये पोहचणार नाही, असे सर्वजण म्हणत होते. पण आरसीबीने त्यानंतर लागोपाठ सहा सामन्यात बाजी मारत इतिहास रचला. आरसीबीने चेन्नईचा 27 धावांनी पराभव करत प्लेऑफमध्ये दिमाखात प्रवेश केला. प्लेऑफमध्ये पोहचणारा आरसीबी चौथा संघ ठरला. आरसीबीने 14 सामन्यात 7 विजय मिळवले, तर सात सामन्यात पराभवाचा सामना केला.