हैदराबाद : आयपीएल (IPL 2024) मध्ये 18 व्या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादनं (Sun Risers Hyderabad) टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा बॅटिंगला उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्जनं (Chennai Super Kings) सावध सुरुवात केली. चेन्नईचे सलामीवर रचिन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाड लवकर बाद झाले. रचिन रवींद्रला भूवनेश्वर कुमारनं 12 धावांवर बाद केलं. तर ऋतुराज गायकवाडनं 26 धावा केल्या. यानंतर अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबेनं चेन्नईचा डाव सावरला. हैदराबादच्या गोलदाजांनी कमबॅक करत चेन्नईची धावसंख्या आटोक्यात ठेवली. चेन्नई सुपर किंग्ज 5 बाद  165 धावा करु शकली. 


चेन्नईची सावध सुरुवात संधी मिळताच आक्रमण


चेन्नई सुपर किंग्जनं पहिल्यांदा फलंदाजी करताना सावध सुरुवात केली. रचिन रवींद्र 12 आणि ऋतुराज गायकवाड 26 धावा करुन बाद झाल्यानंतर चेन्नईचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांनी डाव सावरला. अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांनी फटकेबाजी केली. शिवम दुबे 45 धावा करुन बाद झाला, त्याची विकेट पॅट कमिन्सनं घेतली. यासह पॅट कमिन्सच्या आयपीएलमधील 50 विकेट पूर्ण झाल्या. अजिंक्य रहाणेनं मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विकेट गमावली. त्यानं 30 बॉलमध्ये 35 धावा केल्या.  रवींद्र जडेजा आणि मिचेलला मोठी फटकेबाजी करण्यात अपयश आलं. हैदराबादच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजांना मोठे फटके मारु दिले नाहीत.  रवींद्र जडेजानं 31 धावा केल्या. महेंद्रसिंह धोनी बॅटिंगसाठी  येताच हैदराबादच्या प्रेक्षकांनी त्याचं स्वागत केलं. 


हैदराबादच्या बॉलर्सनी करुन दाखवलं


सनरायजर्स  हैदराबादच्या बॉलर्सनी चेन्नई सुपर किंग्ज मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत असतानाच महत्वाच्या विकेट घेतल्या. अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांची भागिदारी कॅप्टनं पॅट कमिन्सनं ब्रेक केली. शिवम दुबेला कमिन्सनं 45 धावांवर बाद केलं. यानंतर अजिंक्य रहाणे देखील मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. यानंतर हैदराबादच्या बॉलर्सनी चेन्नईला 17 व्या ओव्हरपर्यंत मोठे फटके मारू दिले नाहीत. 


चेन्नई सुपर किंग्जला तिसरा विजय मिळणार? 


चेन्नई सुपर किंग्जनं आजच्या मॅचपूर्वी तीन मॅच  खेळल्या आहेत. त्यामध्ये त्यांना दोन विजय मिळाले तर एका मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. चेन्नईनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्सला पराभूत केलं होतं. मात्र, त्यांना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. तर, हैदराबादचा संघ दुसऱ्या विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरला आहे. 


संबंधित बातम्या :


IPL 2024, CSK vs SRH : मुस्तफिजूर रहमान मायदेशी परतला, चेन्नई तरीही टेन्शन फ्री, जाणून घ्या कारण


 Video: मुंबईचे सलग तीन पराभव, हार्दिक पांड्या महादेवाच्या चरणी, सोमनाथ मंदिरात पूजा