IPL 2024 CSK vs RCB : आयपीएलच्या रनसंग्रामाला (IPL 2024) फक्त 48 तास बाकी आहेत. 22 मार्च रोजी आयपीएलच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये सलामीची लढत होणार आहे. क्रिकेट जगतातील सर्वात दोन धुरंधर, विराट कोहली (Virat Kohli) आणि एमएस धोनी (MS Dhoni) यांना पाहण्यासाठी स्टेडियमवर खच्चाखच गर्दी जमेल. आरसीबी आणि सीएसके यांच्यातील सामना पाहण्यासाठी तिकिटांची खरेदी करण्यासाठी (What is the ticket price of IPL 2024 CSK vs RCB? ) चाहत्यांमध्ये स्पर्धा सुरु असेल. 


18 मार्च 2024, सोमवारी सकाळी 9.30 मिनिटांपासून आयपीएलच्या पहिल्या सामन्यासाठी तिकिटांची विक्री सुरु झाली आहे. Paytm अॅप आणि Paytm Insider च्या संकेतस्थळावर तिकिटांची विक्री सुरु झाली आहे.  चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणारा सामना पाहण्यासाठी चाहत्यांकडून तिकिटांची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरु केली आहे. ई तिकिट दाखवून चाहते स्टेडियममध्ये प्रवेश करु शकतात. यावेळी तिकिटाची पर्ची घेऊन स्टेडियमवर जाण्याची गरज नाही. ऑनलाईन माध्यमातून एक व्यक्ती दोन तिकिटं खरेदी करु शकतो. 


तिकिटाची किंमत किती ?


अनेकांना ऑनलाईन तिकिट खरेदी करायचं असते, Paytm Insider संकेतस्थळामार्फत तुम्हाला तिकिट उपलब्ध झाल्यास नोटिफिकेशन मिळू शकतं. तुम्ही उपलब्ध असल्यास रिक्त तिकिट खरेदी करु शकता. तिकिटाची किंमत 1500 ते 7500 रुपये इतकी आहे. दरम्यान, आयपीएल 2024 साठी आतापर्यंत फक्त 21 सामन्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. देशात सार्वत्रिक निवडणुका असल्यामुळे फक्त पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. उर्वरित वेळापत्रक थोड्याच दिवसात जाहीर होणार आहे. 


ऑनलाईन तिकिट कसं खरेदी कराल ? How to buy tickets online?


पेटीएम अथवा www.insider.in या ठिकाणी जा 


TATA IPL 2024 ticket हा पर्याय सर्च करा  


तिकिटांसाठी मोठी मागणी असल्यामुळे थोडा वेळ थांबावं लागेल. 
 
स्टेडियमचा लेआऊट पाहा, त्यानंतर योग्य त्या तिकिटाची निवड करा. 


तुम्ही जास्तीत जास्त 2 तिकिटं खरेदी करु शकता. 


तिकिटांची रक्कम भरण्यासाठी सोपी पद्धत ठेवा. तुम्हाला तिकिटाची डिलिव्हरी हवी असल्यास पत्ता व्यवस्थित टाका.
 
कार्टमध्ये तिकिट टाकल्यानंतर ते खरेदी करण्यासाठी फक्त सात मिनिटांचा वेळ असेल. 


CSK vs RCB सामना कधी सुरु होणार ?


आयपीएलच्या 17 व्या हंगामातील पहिला सामना सीएसके आणि आरसीबी यांच्यामध्ये चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. एमएस धोनीचा चेन्नई संघ घरच्या मैदानावर यंदाच्या आयपीएलची विजयी सुरुवात करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. शुक्रवारी रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी 6.30 वाजता आयपीएल उद्घाटनाचा समारंभ होईल. त्यामध्ये अक्षय कुमारपासून दिग्गज परफॉर्म करतील. सामना पाहण्यासाठी जायचं अशेल तर Paytm Insider  जाऊन तिकिट खरेदी करु शकता.