RCB Playing XI : आयपीएल 2024 चं बिगुल वाजलं आहे. 22 मार्चपासून 17 व्या हंगामाला दणक्यात सुरुवात होईल. आरसीबी आणि सीएसके यांच्यामध्ये सलामीचा सामना रंगणार आहे. चेन्नईच्या मैदानावर आरसीबी आणि सीएसके यंदाच्या हंगामातील पहिला सामना खेळतील. यंदाच्या हंगामात आरसीबीच्या संघात काही बदल झाले आहेत, ते काही नव्या खेळाडूसह मैदानात उतरतील. कॅमरुन ग्रीनच्या समावेशामुळे आरसीबीची ताकद दुपट्टीनं वाढली आहे. पण यंदाच्या आयपीएल हंगामात आरसीबीची प्लेईंग 11 कशी असेल. फाफ डु प्लेसिस कोणत्या 11 शिलेदारासह मैदानात उतरु शकतो, याबाबत आपण जाणून घेऊयात. 


यंदाही आरसीबीची केजीएफवरच अवलंबून - 


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ दोन वर्षांपासून केजीएफवर अवलंबून असेल. केजीएफ म्हणजे, कोहली, ग्लेन आणि फाफ.. या तीन फलंदाजांच्या आजूबाजूला आरसीबीची फलंदाजी आहे. या तीन फलंदाजांच्या जोरावर आरसीबी यंदाही उतरणार आहे. पण त्यांच्या जोडीला आता कॅमरुन ग्रीन आणि रजत पाटीदार हे विश्वासू खेळाडूही असतील. विकेटकीपर फलंदाज म्हणून दिनेश कार्तिक अथवा महिपाल लोमरोर खेळताना दिसेल. दोघांकडेही विस्फोटक फलंदाजी करण्याची क्षमता आहे. 


गोलंदाजीमध्येही मोठा बदल झालाय -


आरसीबीची फिरकी बाजू कमकुवत दिसत आहे. कर्ण शर्मा याच्यावर फिरकीची धुरा असेल. त्याच्या जोडीला ग्लेन मॅक्सवेल आहे. वेगवान गोलंदाजीचा भार मोहम्मद सिराज याच्यावर असेल. त्याच्याशिवाय लॉकी फर्ग्यूसन आणि अल्जारी जोसेफ हे विदेशी गोलंदाजही असतील. आकाश दीप आणि यश दयाल यासारखे भारतीय गोलंदाजही आरसीबीच्या ताफ्यात आहेत. 


आरसीबीची संभाव्य प्लेईंग 11 


विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, यश दयाल/आकाश दीप आणि अल्जारी जोसेफ.


आरसीबीच्या ताफ्यात कोण कोण ?


फाफ डु प्लेसिस (कर्णधार), कॅमरुन ग्रीन, विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, अल्जारी जोसेफ, यश दयाल, आकाशदीप, अनुज रावत, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, सौरव चौहान, स्वप्निल सिंह, मयंक डागर, मनोज भांडागे, टॉम करन, रीस टॉप्ली, हिमांशु शर्मा, राजन कुमार, विजयकुमार वैशाख 


दरम्यान, मागील 16 वर्षांत आरसीबीला एकदाही चषकावर नाव कोरता आले नाही. पहिल्या हंगामापासून आरसीबीकडे दिग्गज खेळाडूंचा भरणा होता, पण त्यांना चषकावर नाव कोरण्यात यश मिळालं नाही. प्रत्येक आयपीएल स्पर्धेआधी आरसीबीकडे जेतेपदाचा दावेदार म्हणून पाहिलं जातं, पण त्यांना चषकावर नाव कोरता येत नाही. आरसीबीचा संघ यंदा तरी चषकावर नाव कोरणार का? याची चाहत्यांना उत्कंठा लागली आहे.