IPL 2023 Points Table : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात सुपर शनिवारी दोन जबरदस्त सामने पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यात लखनौने हैदराबादचा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात पंजाबने दिल्लीचा पराभव केला. या दोन सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा फेरबदल झालाय. लखनौने चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. राजस्थान आणि आरसबीच्या संघाची घसरण झाली. शिखर धवनच्या पंजाब संघाने गुणतालिकेत सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. पंजाबचे १२ सामन्यात १२ गुण झाले आहेत. फाफच्या नेतृत्वातील आरसीबीचा संघ सातव्या क्रमांकावर घसरलाय. 


आरसीबी-राजस्थानच्या संघाची घसरण - 


लखनौने हैदराबादचा पराभव करत स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवलेय. कृणाल पांड्याच्या नेतृत्वातील लखनौने एडन मार्करमच्या संघाचा सात विकेटने पराभव केला. या विजयासह लखनौ संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहचलाय.  लखनौने १२ सामन्यात १३ गुणांच कमाई केली आहे. लखनौने सहा सामन्यात विजय मिळवलेत तर एक सामना अनिर्णित झाला होता. लखनौच्या विजयामुळे राजस्थानचा संघ पाचव्या क्रमांकावर घसरलाय. तर पंजाबच्या विजयानंतर आरसीबीचा संघ सातव्या स्थानावर घसरलाय. 


गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहे. तर धोनीचा चेन्नई दुसऱ्या स्थानावर आहे. गुजरातचा संघाने १२ सामन्यात आठ विजय मिळवलेत. गुजरात १६ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर धोनीचा चेन्नईने १५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईने १२ सामन्यात सात विजय मिळवलेत तर त्यांचा एक सामना पावसामुळे वाया गेला होता.. चेन्नईचे १५ गुण आहेत.  मुंबई इंडियन्सने गुजरातचा पराभव करत गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकवर झेप घेतली आहे. मुंबईने १२ सामनयात सात विजय मिळवलेत.


दिल्ली-हैदराबादचे संघ तळाशीच -  


आरसीबी १० गुणांसह गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स १२ सामन्यात १० गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. तळाशी असणाऱ्या हैदराबाद आणि दिल्ली संघाला आज पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबाद संघाचा आज सातवा पराभव होता. ११ सामन्यात हैदराबादला फक्त पाच सामन्यात विजय मिळवता आलेत. हैदराबाद आणि कोलकाता संघाचे स्पर्धेतील आव्हान अतिशय खडतर झालेय. प्लेऑफमधील त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात आलेय. तर दिल्लीचे आव्हान संपले आहे. दिल्लीला १२ सामन्यात आठ पराभवाचा सामना करावा लागलाय. दिल्लीने चार सामने दिंकले असून त्यांचे फक्त आठ गुण आहेत. दिल्लीचे उर्वरित दोन सामने पंजाब आणि चेन्नई या संघासोबत आहेत. दिल्ली या संघाचे गणित बिघडवू शकते.