Royal Challengers Bangalore Record in IPLइंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) यंदा सोळावा हंगाम सुरु आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये दहा संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. रॉयल चँलेंजर्स बंगळुरुला (Royal Challengers Bangalore) गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. केकेआर (KKR) आरसीबीवर (RCB) 81 धावांनी विजय मिळवला. यातच आता आरसीबीच्या नावे नकोसा विक्रम झाला आहे. आरसीबी संघाचा आयपीएलमध्ये 50 हून अधिक धावांच्या फरकाने सर्वाधिक सामन्यांमध्ये पराभव झाला आहे.


RCB in IPL : आरसीबीच्या नावे नकोसा विक्रम


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वात जास्त सामन्यांत 50 हून अधिक धावसंख्येच्या फरकाने पराभव पत्करावा लागला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ या यादीत आघाडीवर आहे. आरसीबी संघाला इंडियन प्रीमियर लीगमध्ये 16 वेळा 50 हून अधिक धावसंख्येने सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा क्रमांक लागतो. दिल्लीने 50 हून अधिक धावांच्या फरकाने 15 सामने गमावले आहेत. तर राजस्थान रॉयल्स या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून राजस्थान 9 वेळा 50 हून अधिक धावांनी पराभव झाला आहे.






 


Most Loss by 50+Runs Margin : 50 हून अधिक धावांच्या फरकाने सर्वाधिक सामने गमावले


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : 16


दिल्ली कॅपिटल्स : 15


राजस्थान रॉयल्स : 09






दरम्यान, आयपीएलच्या इतिहासात पंजाब किंग्ससमोर  विरुद्ध संघाने सर्वाधिक वेळा 200 हून अधिक धावांचं लक्ष्य ठेवण्यात आलं आलं. आहे. आयपीएलमध्ये एकूण 22 सामन्यांमध्ये पंजाब किंग्स संघाला 200 हून अधिक धावसंख्येचा पाठलाग करावा लागला. त्यानंतर आरसीबीचा क्रमांक लागतो. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 21 वेळा 200 हून अधिक धावांचं लक्ष्य मिळालं आहे.


KKR vs RCB : कोलकाताकडून आरसीबीचा पराभव


आयपीएलमध्ये गुरुवारी केकेआरने आरसीबीचा 81 धावांनी दारुण पराभव केला. यावेळी संघाचा मालक शाहरुख खान (Shah Rukh Khan) संघाला प्रोत्साहन देताना पाहायला मिळाला. केकेआरने आरसीबीचा पराभव करून गुणतालिकेत खातं उघडलं. 205 धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संपूर्ण संघ केवळ 123 धावांवर बाद झाला. गोलंदाज सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा यांनी आरसीबीच्या फलंदाजांचं कंबरडं मोडलं. शार्दुल ठाकूरच्या झंझावाती अर्धशतकामुळे पहिल्या डावात केकेआरने 20 षटकांत सात गडी गमावून 204 धावा केल्या.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 : RCB चा पराभव, KKR चा विजय; शाहरुखची मैदानातच विराटला कडकडून मिठी, गालही ओढला, Video होतोय व्हायरल