IPL 2023 Points Table After CSK vs LSG : आयपीएल 2023 (IPL 2023) मधील सोमवारी झालेल्या सहाव्या सामन्यानंतर आयपीएल गुणतालिकेमध्ये (IPL Points Table) मोठा बदल झाला आहे. चेन्नईला (Chennai Super Kings) लखनौच्या (Lucknow Super Giants) पराभवाचा फायदा झाला आहे. त्यासोबतच रॉयल चॅलेंजर बंगळुरुसाठीही (Royal Challengers Bangalore) हा सामना फायदेशीर ठरला आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने (CSK) लखनौ सुपर जायंट्सविरोधातील (LSG) सामना जिंकल आपलं खातं उघडलं. आयपीएल 2023 मधील हा चेन्नईचा पहिला विजय आहे. गुजरात टायटन्स (Gujrat Titans) विरुद्धच्या सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच सोमवारी झालेल्या सामन्यात लखनौ संघाचा 12 धावांनी पराभव झाला. हा लखनौचा यंदाच्या मोसमातील पहिला पराभव आहे. आयपीएलमधील सहाव्या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलची (IPL 2023 Points Table) काय स्थिती आहे जाणून घ्या.


लखनौचा पराभव, चेन्नईचा फायदा


या विजयानंतर चेन्नईला फायदा झाला आहे, तर दुसरीकडे लखनौला फटका बसला आहे. या सामन्यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेमध्ये मोठा बदल झाला आहे. या विजयानंतर चेन्नईचा संघ सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यापूर्वी चेन्नईचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर होता. दोन सामन्यांत एक विजय आणि एक पराभवानंतर चेन्नईकडे दोन गुण आहेत. लखनौ संघाने पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. चेन्नई विरुद्धच्या सामन्याआधी लखनौ संघ दुसऱ्या क्रमांकावर होता, मात्र चेन्नईकडून झालेल्या पराभवानंतर हा संघ दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील या संघाकडे दोन सामन्यांमध्ये एक विजय आणि एका पराभवानंतर दोन गुण आहेत, पण या संघाचा नेट रनरेट चेन्नईपेक्षा खूपच चांगला आहे आणि त्यामुळे हा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.


चेन्नईच्या विजयाचा बंगळुरुला फायदा


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (Royal Challengers Bangalore) चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) विजयाचा फायदा झाला आहे. बंगळुरूला दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या लखनौच्या (Lucknow Super Giants) दुसऱ्या स्थानावरून घसरण्याचा फायदा झाला आहे. राजस्थानचा (Rajsthan Royals) संघ अजूनही पहिल्या स्थानावर आहे. चौथ्या स्थानावर गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि पाचव्या क्रमांकावर पंजाब किंग्स (Punjab Kings) संघ आहे. सहाव्या क्रमांकावर चेन्नई आहे. 


पहिल्या क्रमांकापासून सहाव्या स्थानापर्यंत सर्व संघांकडे प्रत्येकी दोन गुण आहेत पण नेट रन रेटमुळे संघांचं गुणतालिकेतील स्थान बदललं आहे. चेन्नई सहाव्या क्रमांकावर गेल्याने कोलकाताला (Kolkata Knight Riders) एका स्थानाचा फटका बसला आहे. आणि हा संघ सातव्या क्रमांकावर घसरला आहे. आठव्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians), नवव्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि दहाव्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


IPL 2023, CSK vs LSG : चेन्नईनं पहिल्या विजयासह खातं उघडलं, मराठमोळ्या ऋतुराजसह मोईन अली ठरले विजयाचे शिल्पकार