KKR vs RR, IPL 2023 : संजू सॅमसनच्या नेतृत्वातील पिंक आर्मी आज कोलकात्याविरोधात दोन हात करणार आहे. प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघाला विजय गरजेचा आहे. दोन्ही संघाची जमेची बाजू फिरकी गोलंदाजी आहे. दोन्ही संघात दर्जेदार फिरकी गोलंदाज आहेत. फलंदाजीतील सातत्य हा दोन्ही संघासमोरील मोठा प्रश्न आहे. वानखेडे मैदानावर हा सामना रंगणार आहे. वानखेडेची खेळपट्टी कशी असेल... आतापर्यंत कुणाचे पारडे जड... कधी अन् कुठे पाहाल सामना ? यासह सर्व माहिती जाणून घेऊयात....


KKR vs RR Head to Head : कोलकाता विरुद्ध राजस्थान  हेड टू हेड आकडेवारी


आयपीएलच्या इतिहासात कोलकाता आणि राजस्थान यांच्यात आतापर्यंत 27 लढती झाल्या आहेत. आकडेवारी पाहिल्यास कोलकात्याचे पारडे जड असल्याचे दिसतेय. कोलकात्याने 27 पैकी 14 सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानला 12 सामन्यात विजय मिळवता आलाय.  एक सामन्याचा कोणताही निकाल लागला नव्हता.. राजस्थानविरोधात कोलकात्याची सर्वोच्च धावसंख्या 210 इतकी आहे. तर निचांक्की धावसंख्या 125 इतकी आहे. राजस्थानची कोलकात्याविरोधात 217 धावसंख्या सर्वोच्च आहे तर 81 निचांकी धावसंख्या आहे. 


Eden Gardens Pitch Report : ईडन गार्डन्सची खेळपट्टी कशी आहे?


आज राजस्थान (RR) आणि कोलकाता (KKR) यांच्यातील सामना कोलकाताच्या घरच्या ईडन गार्डन्स मैदानावर पार पडणार आहे. ईडन गार्डन्स स्टेडिअमची (Eden Gardens) खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. या स्टेडियमवर मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते. दरम्यान, या मैदानावर दव महत्त्वाची भूमिका बजावते. दव पडल्यानंतर फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर मदत मिळू लागते, त्यानंतर धावा काढणं कठीण होतं. कोलकात्याकडे वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण आणि सुयेश शर्म असे तीन फिरकी गोलंदाज आहेत.


दोन्ही संघाची गुणतालिकेतील स्थिती काय ?


आयपीएलच्या सोळाव्या हंगामात अद्याप प्लेऑफचा एकही संघ मिळालेला नाही. गुजरात आणि चेन्नई संघ आघाडीवर आहेत. कोलकाता आणि राजस्थान संघाला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणे अनिवार्य आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरतील. दोन्ही संघाचे प्रत्येकी 11 सामने झाले आहेत. दोन्ही संघाचे समान 10 गुण आहेत. नेटरनरेटमुळे राजस्थानचा संघ गुणतालिकेत कोलकात्यापेक्षा पुढे आहे. दोन्ही संघ आजचा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरली. पराभूत संघाचे आयपीएलमधील आव्हान जवळपास संपुष्टात येईल.. तर विजेता संघ प्लेऑफच्या दिशेने वाटचाल करेल.. 


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील. 


IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?


कोलकाता (KKR) आणि राजस्थान (RR) यांच्यात आज 11 मे रोजी सामना रंगणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल. नाणेफेकीचा कौल महत्वाची भूमिका बजावेल.


कोलकाता नाइट रायडर्सची संभावित प्लेईंग 11 :


जेसन रॉय, रहमानुल्लाह गुरबाज, नितीश राणा, वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंह, शार्दुल ठाकुर, सुनील नरेन, हर्षित राणा, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती 


राजस्थान रॉयल्स संभावित प्लेईंग 11 : 


यशस्वी जायसवाल, जोस बटलर, संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर, जो रूट, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, संदीप शर्मा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, ए मेकॉय