IPL 2023 : शुभमन गिलच्या शतकानंतरही नेहरा नाखूश, हार्दिक पांड्याला झापले
Ashish Nehra, IPL 2023 : हैदराबादचा पराभव करत गुजरातने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे.
Ashish Nehra, IPL 2023 : हैदराबादचा पराभव करत गुजरातने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. या सामन्यात शुभमन गिल, मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांनी दमदार कामगिरी केली. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर प्रथम फलंदाजी करताना गिल आणि साई सुदर्शन यांनी गुजरातच्या डावाला आकार दिला होता. पण त्यानंतर गुजरातची फलंदाजी अचानक ढेपाळली. अखेरच्या काही षटकात गुजरातने सहा ते सात विकेट गमावल्या. त्यामुळे गुजरातचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा प्रचंड भडकला होता. याचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियार व्हायरल झालाय. आशिष नेहराने कर्णधार हार्दिक पांड्याला झापल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसेतय.
आशिष नेहरा इतका रागात होता, की शुभमन गिल याचे शतकही त्याने सेलिब्रेट केले नाही. एका बाजूला विकेट पडत असतानाही गिल याने झुंजार शतक झळकावले. त्याचे आयपीएल करिअरमधील हे पहिले शतक होते. गिलने शतक झळकावल्यानंतर कौतुक करत गुजरातच्या बाकीच्या खेळाडूंनी त्याच्यासाठी उभे राहून टाळ्या वाजवल्या. पण आशिष नेहराने तिथेच बसून साधा आनंदही व्यक्त केला नाही. या प्रसंगाचा व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आशिष नेहराला शांत आणि कूल म्हणून ओळखले जाते. पण हैदराबादविरोधात त्याचा पारा चढला. त्याला कारणही तसेच होते. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी 147 धावांची भागिदारी करत गुजरातच्या डावाल आकार दिला होता. पण त्यानंतर गुजरातच्या फलंदाजांनी हराकिरी केली. एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. अखेरच्या षटकात तर गुजरातने चार विकेट फेकल्या. त्यामध्ये शुभमन गिल याचाही समावेश होता. त्यामुळेच गिल याच्या शतकानंतरही नेहाराने सेलिब्रेशन केले नाही. हार्दिक पांड्या बाद होऊन आला तेव्हा नेहाराने त्याला झापल्याचे दिसतेय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर पांड्या आणि नेहरा यांच्यात वाद नेमका कशामुळे झाला, याची चर्चा सुरु झाली.
Ashish Nehra is highly angry that he is not listening to Hardik Pandya. This is Ashish Nehra for you.#GTvsSRH #SRHvsGT pic.twitter.com/X2zEZqzQrc
— Vikram Rajput (@iVikramRajput) May 15, 2023
— ChhalRaheHainMujhe (@ChhalRahaHuMain) May 16, 2023
Ashish Nehra angry 🤬🤬
— Silly Context (@sillycontext) May 15, 2023
"Mujhe Rokne ka kisi mein dum nahi hai"#GTvsSRH #SRHvsGT pic.twitter.com/IHOLlBZvhO
Ashish Nehra is highly angry that he is not listening to Hardik Pandya. This is Ashish Nehra for you.#GTvsSRH #SRHvsGT pic.twitter.com/X2zEZqzQrc
— Vikram Rajput (@iVikramRajput) May 15, 2023