Krunal Pandya, IPL 2023 : केएल राहुल दुखापतीमुळे आधीच आयपीएलमधून बाहेर गेलाय. केएल राहुल याच्या जागी कृणाल पांड्या लखनौच्या संघाची धुरा सांभाळत आहे. पण इकाना स्टेडिअमवर कृणाल पांड्या यालाही दुखापत झाल्याचे समोर आलेय. कृणाल पांड्या याला फलंदाजी करताना त्रास होत होता.. त्याला धाव घेता येत नव्हती. त्यामुळे 49 धावांवर असताना कृणाल पांड्या  Retired Hurt झाला. कृणाल पांड्याची दुखापत लखनौच्या संघाची चिंता वाढवणारी आहे. पांड्याची दुखापत किती गंभीर आहे, हे अद्याप समजू शकले नाहीत. तो गोलंदाजीसाठी मैदानावर येणार का? इतर कोणता खेळाडू संघाची धुरा सांभाळणार.. हे लवकरच स्पष्ट होईल. 


नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनौची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. लखनौच्या तीन विकेट झटपट गेल्या. त्यानंतर कृणाल पांड्याने स्टॉयनिसच्या साथीने लखनौच्या डावाला आकार दिला. कृणाल पांड्या याने संयमी फलंदाजी करत लखनौचा डाव सावरला. कृणाल पांड्या याने 42 चेंडूत संयमी 49 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक चौकार आणि एक षटकार लगावला. कृणाल पांड्या याने अँकरची भूमिका बजावत लखनौच्या डावाला आकार दिला. कृणाल पांड्या याने स्टॉयनिस याच्यासोबत 59 चेंडूत 82 धावांची भागिदारी केली. यामध्ये कृणाल पांड्याचे योगदान 36 धावांचे होते. स्टॉयनिसआधी पांड्याने डिकॉकसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. कृणाल पांड्याने डिकॉक याच्यासोबत 23 धावांची भागिदारी केली. कृणाल पांड्याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. 49 धावा झाल्या पण खेळपट्टीवर धावताना पांड्याला त्रास जाणवत होता. त्यामुळे पांड्याने  Retired Hurt होण्याचा निर्णय घेतला.