IPL 2023, RCB vs KKR: जेसन रॉय याचे दमदार अर्धशतक आणि नीतीश राणा याची कर्णधाराला साजेशी फलंदाजीच्या जोरावर कोलकाताने निर्धारित २० षटकात पाच विकेटच्या मोबदल्यात २०० धावांपर्यंत मजल मारली. हसरंगा आणि वैशाक यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. डेविड विसे आणि रिंकू सिंह यांनी अखेरच्या षटकात फटकेबाजी केल्यामुळे कोलकात्याचा संघ २०० धावांपर्यंत पोहचू शकला. आरसीबीला विजयासाठी २०१ धावांचे आव्हान दिलेय. 


जेसन रॉय याची अर्धशतकी खेळी - 


सलामी फलंदाज जेसन रॉय याने सुरुवातीपासूनच आक्रमक रुप धारण केले होते. जेसन रॉय याने २९ चेंडूत ५६ धावांचे योगदान दिलेय. या खेळीत जेसन रॉय याने पाच षटकार आणि चार चौकार लगावले. विजयकुमार वैशाक याने जेसन रॉय याला यॉर्करवर क्लीनबोल्ड केले. जेसन रॉय याने शाहबाज याच्या एकाच षटकात चार षटकार मारले होते. जेसन रॉय याने कोलकात्याच्या धावसंख्येला आकार दिला. जेसन रॉ याने वादळी फलंदाजी केली. जेसन रॉय याला जगदीशन याने चांगली साथ दिली. संयमी फलंदाजी करणाऱ्या जगदीशन याने २७ धावांचे योगदान दिले. जगदीशन याने या खेळीत चार चौकार लगावले. 



कोलकात्याची दमदार सलामी -
जेसन रॉय आणि एन जगदीशन या जोडीने कोलकात्याला दमदार सलामी दिली. जगदीशन याने संयमी फलंदाजी केली तर जेसन रॉय याने आक्रमक रुप धारण केले होते. जेसन रॉय आणि जगदीशन यांनी ९.२ षटकात ८३ धावांची सलामी दिली. यंदाच्या आयपीएलमधील कोलकात्याची ही सर्वात मोठी भागिदारी होय.. पावरप्लेमध्ये या दोन्ही फलंदाजांनी सहा षटकात ६६ धावा केल्या होत्या. याआधीच्या सात सामन्यात पावरप्लेमध्ये कोलकात्याच्या सरासरी दोन विकेट पडल्या आहेत. पहिल्यांदाच कोलकात्याने पावरप्लेमध्ये एकही विकेट गमावली नाही. जेसन रॉय याने अर्धशतकी खेळी केली त जगदीशन याने २७ धावांचे योगदान दिले. 


राणा-अय्यरची दमदार भागिदारी - 


कर्णधार नीतीश राणा आणि वेंकटेश अय्यर यांनी कोलकात्याची धावसंख्या झटपट वाढवली. दोघांनी ४४ चेंडूत ८० धावांची भागिदारी केली. दोघांनी चौकार आि षटकारांचा पाऊस पाडला. नीतीश राणा याने २१ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. या खेळीत राणा याने चार षटकार आणि तीन चौकार लगावले. वेंकटेश अय्यर याने २६ चेंडूत ३१ धावांचे योगदान दिले. या छोचेखानी खेळीत अय्यर याने तीन चौकार लगावले.  राणा आणि अय्यर यांच्या खेळीमुळे कोलकाता संघ १७० च्या पार गेला. 


रिंकूची फटकेबीजी - 
अखेरच्या दोन षटकात रिंकू सिंह आणि डिव विसे यांनी फटकेबाजी करत कोलकात्याची धावसंख्या २०० पर्यंत पोहचवली. रिंकू सिंह याने १० चेंडूत १८ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एख षटकार आणि दोन चौकार लगावले. तर डेविड विझे याने अखेरच्या षटकात तीन चेंडूत दोन षटकारासह १२ धावा चोपल्या.  आंद्रे रसेल याला फटकेबाजी करण्यात अपयश आले. तो एका धावेवर त्रिफाळाचीत बाद झाला.


आरसीबीची खराब फिल्डिंग - 
आरसीबीच्या फिल्डर्सनी खराब क्षेत्ररक्षण केले. एकेरी दुहेरी धावा दिल्याच पण झेलही सोडले. कोलकात्याचा कर्णधार नीतीश राणा याचे सुरुवातीलाच दोन झेल सोडले. मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल यांनी राणाचे झेल सोडले. याचा फायदा नीतीश राणा याने उचलला. नीतीश राणा याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. राणा याने ४८ धावांची खेळी केली.


आरसीची गोलंदाजी कशी ?
आरसीबीकडून वानंदु हसरंगाने सर्वात भेदक मारा केला. हसरंगा याने चार षटकात २४ धावा खर्च करत दोन फलंदाजांना तंबूत धाडले. हसरंगा याने एकाच षटकात नीतीश राणा आणि वेंकटेश अय्यर यांना तंबूत धाडले. विजयकुमार वैशाक यानेही चार षटकात ४१ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. मोहम्मद सिराजला एक विकेट मिळाली. इतर गोलंदाजांची विकेटची पाटी कोरीच राहिली.