IPL 2023 : रनमशीन विराट कोहलीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलेय. विराट कोहली ज्या खेळाडूची स्थुती करतो, तो खेळाडू पुढील सामन्यात शून्यावर बाद होतो. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर आकडेवारीच मांडला आहे. मुंबई आणि लखनौ यांच्यातील सामन्यात सूर्यकुमार यादव स्वस्तात तंबूत परतला. त्या सामन्याआधी सूर्याकुमार यादव याने शतक झळकावले होते. त्यानंतर विराट कोहलीने मानले रे भाऊ असे म्हणत सूर्याचे कौतुक केले होते. त्यानंतर सूर्या फ्लॉफ ठरला.. त्यानंतर नेटकऱ्यांनी विराट कोहलीने कौतुक केलेल्या खेळाडूंची यादीच मांडली आहे. कोहलीनं कौतुक केल्यावर पुढच्याच सामन्यात गंडलेल्या खेळाडूंची आकडेवारीच सोशल मीडियावर मांडली.
याचा सिलसिला गुजरातच्या संघापासून सुरु झाला. गुजरातचा सलामी फलंदाज वृध्दीमान साहा याने दमदार फलंदाजी केली होती. त्यानंतर विराट कोहलीने त्याचे कौतुक केले. त्याच्यापुढील सामन्यात साहा शून्यावर बाद झाला. त्याशिवाय कोलकाताविरोधात राजस्थानचा सलामी फलंदाज यशस्वी जायस्वल याने अवघ्या 13 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्यानंतर विराट कोहलीने त्याचे कौतुक केले. पण पुढच्याच सामन्यात यशस्वी जायस्वाल शून्यावर बाद झाला. मुंबई इंडियन्सचा खेळाडू सूर्यकुमार यादवने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले. मात्र लखनौविरुद्धच्या सामन्यात तो केवळ सात धावा करून बाद झाला. साहा, यशस्वी आणि सूर्या या तिघांबद्दल विराट कोहलीने इन्स्टाग्राम पोस्ट केली होती. इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर कौतुक केले. पण कोहलीच्या कौतुकानंतर हे तिघे पुढच्या सामन्यात सपशेल अपयशी ठरले. हे सोशल मीडियावर कोहलीचे कौतुक नाही. शिव्याशापाच्या टिप्पण्या केल्या जात आहेत, असे नेटकऱ्यांनी म्हटलेय.
शुभमन गिल याच्या शतकानंतर विराट कोहली याने त्याचे कौतुक केले होते. वरील हिशोबानंतर आता पुढचा नंबर शुभमन गिल याचा आहे, अशी प्रतिक्रिया नेटकरी सोशल मीडियावर देत आहेत. हैदराबादविरोधात शतक झळकावल्यानंतर कोहलीने त्याच्या इन्स्टाग्रामवर गिल याचे कौतुक केले होते. मागील तीन खेळाडूंबद्दलचा योगायोग पाहता गिलला पुढच्या सामन्यात धक्का बसेल असे मीम्स सोशल मीडियावर फिरत आहेत. योगायोगाने गुजरातनंतर होणारा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आहे. त्यामुळे मिम्सचा पाऊस आणखी पडलाय.