IPL 2022 Yuvraj Singh : कोलकाता नाइटराइडर्सने (Kolkata Knight Riders) दिल्ली कॅपिटल्सविरोधात (Delhi Capitals) संघामध्ये तीन बदल केले. या सामन्यात कोलकात्याने स्टार वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) याला संधी दिली नाही. कोलकात्याच्या या निर्णायावर युवराज सिंह नाराज झालाय. युवराजने ट्विट करत कोलकात्याच्या निर्णायावर नाराजी व्यक्त केली आहे.  


दिल्लीविरोधात कोलकात्याने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला संघात स्थान दिले नाही. त्यावर युवराजने ट्विट करत नाराजी व्यक्त केली.  ' कमिन्स दुखापतग्रस्त नसतानाही बाहेर कसे बसवले? तो वर्ल्ड क्लास अष्टपैलू खेळाडू आहे. एक दोन सामन्यात कामगिरी खराब झाल्यामुळे बाहेर बसवणे चुकीचं आहे. कोलकात्याने त्याच्यावर विश्वास ठेवायला हवं. प्रोत्साहन द्यायला हवं. कारण कमिन्स तुम्हाला सलग तीन सामनेही जिंकून देऊ शकतो.' 






गोलंदाजी खराब कामगिरी, फलंदाजीत प्रभावी -
यंदाच्या हंगामात पॅट कमिन्सला आपल्या गोलंदाजीत लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. कमिन्स महागडा ठरला, त्याला विकेटही घेण्यात अपयश आले. पण फलंदाजीत कमिन्सने दमदार कामगिरी केली आहे. मुंबईविरोधात कमिन्सने गेलेला सामना परत आणला. कमिन्सने 14 चेंडूत अर्धशतक झळकावत सामना फिरवला.  पण गोलंदाजीत त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही. कमिन्सने 12 च्या इकॉनॉमीने चार सामन्यात चार विकेट घेतल्या आहेत.  


कोलकातामध्ये तीन बदल - 
दिल्लीविरोधात श्रेयस अय्यरने अंतिम 11 मध्ये तीन बदल केले आहेत. विकेटकिपर फलंदाज बाबा इंद्रजीतला संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय एरॉन फिंचचे पुनरागमन झालेय. त्याशिवाय दिल्लीच्या ह्रषित राणालाही संधी देण्यात आली आहे. कोलकात्याने फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला वगळले आहे. कोलकात्याने शिवम मावी आणि सॅम बिलिंग्सला आराम दिलाय.