CSK vs RCB, IPL 2022: चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात (Chennai Super Kings Vs Royal Challengers Bangalore) नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर (Dr DY Patil Sports Academy, Mumbai) आयपीएलचा 22 वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून आरसीबीच्या संघानं चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर फिल्डिंग करण्यासाठी मैदानात आलेले आरसीबीची सर्व खेळाडूच्या हातावर काळी पट्टी बांधलेली दिसली. ज्यामुळं आरसीबीच्या संघानं हातावर काळी पट्टी का बांधली? असा प्रश्न अनेकजण उपस्थित करून लागले. यामागचं कारण समोर आलं आहे. 


आरसीबीचा स्टार वेगवान गोलंदाज हर्षल पटेल आपल्या बहिणीच्या मृत्यूनंतर आपल्या घरी परतला आहे. हर्षल पटेलच्या बहिणीला श्रद्धांजली वाहण्यासाठी आरसीबीचा संघ आज काळी पट्टी बांधून मैदानात उतरला आहे. या हंगामात आरसीबीनं चार सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. तर, केवळ एक सामना गमावला आहे. दुसरीकडं चेन्नईच्या संघानं या हंगामात निराशाजनक कामगिरी केली आहे. चेन्नईनं आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. मात्र, अद्याप त्यांना विजयी खाते उघडता आले नाही.


चेन्नईविरुद्ध सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुयश प्रभुदेसाई आणि जोश हेजलवूड यांचा आरसीबीच्या अंतिम अकरामध्ये समावेश करण्यात आला आहे.  फाफ डू प्लेसिस हा गेल्या मोसमापर्यंतच चेन्नईच्या संघाचा भाग होता.  चेन्नईला गेल्या हंगामात चॅम्पियन बनवण्यात फाफ डू प्लेसिसचा मोलाचा वाटा उचलला होता.


दरम्यान, या वर्षी आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये बंगळुरूच्या संघानं फाफ डू प्लेसिस आणि जोश हेजलवूड यांच्यावर बोली लावली. हे दोघेही चेन्नईच्या संघाकडून खेळत होते. आयपीएलच्या मागच्या हंगामात विराट कोहलीनं आरसीबीचं कर्णधारपद सोडण्याचं निर्णय घेतला होता. या हंगामात बंगळुरूच्या संघानं फाफ डू प्लेसिसवर संघाची जबाबदारी सोपवली. 


हे देखील वाचा-