Wanindu Hasaranga five Wicket : वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात आरसीबीने हैदराबादचा 67 धावांनी पराभव केला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 192 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरदाखल मैदानात उतरणाऱ्या हैदराबादचा संघ वानंदु हसरंगाच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. हसरंगाच्या फिरकीपुढे हैदराबादचा डाव 125 धावांत संपुष्टात आला. हसरंगाने हैदराबादविरोधात चार षटकात 18 धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला. 

यंदाच्या हंगामात हसरंगाआधी दोन गोलंदाजांनी एकाच डावात पाच विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. यजुवेंद्र चहलने कोलकाताविरोधात ब्रेबॉन स्टेडिअमवर तर उमरान मलिकने गुजरातविरोधात पाच विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. चहलने चार षटकात 40 धावा देत पाच विकेट घेतल्या तर उमरान मलिकने 25 धावा खर्च करत पाच विकेट घेतल्या. आयपीएलच्या इतिहसात 27 गोलंदाजांनी एका डावात पाच विकेट घेण्याचा भीमपराक्रम केलाय.  आयपीएलमध्ये एका डावत पाच विकेट घेणारे गोलंदाज- 

सोहेल तनवीर : 2008- चेन्नई सुपर किंग्स विरोधातलक्ष्मीपती बालाजी: 2008- किंग्स 11 पंजाब विरोधातअमित मिश्रा: 2008- डेक्कन चार्जर्स विरोधातअनिल कुंबळे: 2009- राजस्थान रॉयल्स विरोधातलसिथ मलिंगा: 2011- दिल्ली डेयरडेविल्स विरोधातहरभजन सिंह: 2011- चेन्नई सुपर किंग्स विरोधातईशांत शर्मा: 2011- कोच्चि टस्कर्स विरोधातमुनाफ पटेल: 2011- किंग्स 11 पंजाब विरोधातरवींद्र जडेजा: 2012- डेक्कन चार्जर्स विरोधातदिमित्री मस्कारेनहास: 2012- पुणे वॉरियर्स विरोधातसुनील नरेन: 2012- किंग्स 11 पंजाब विरोधातजेम्स फॉक्नर: 2013- सनराइजर्स हैदराबाद विरोधातजयदेव उनादकट: 2013- दिल्ली डेयरडेविल्स विरोधातजेम्स फॉक्नर: 2013- सनराइजर्स हैदराबाद विरोधातएडम जम्पा: 2016- सनराइजर्स हैदराबाद विरोधातअँड्रयू टाई: 2017- रायजिंग पुणे सुपरजाइंट्स विरोधातभुवनेश्वर कुमार: 2017- किंग्स 11 पंजाब विरोधातजयदेव उनादकट: 2017- सनराइजर्स हैदराबाद विरोधातअंकित राजपूत: 2018- सनराइजर्स हैदराबाद विरोधातअल्जारी जोसेफ: 2019- सनराइजर्स हैदराबाद विरोधातवरुण चक्रवर्ती: 2020- दिल्ली कॅपिटल्स विरोधातहर्षल पटेल: 2021- मुंबई इंडियन्स विरोधातआंद्रे रसेल: 2021- मुंबई इंडियन्स विरोधातअर्शदीप सिंह: 2021- राजस्थान रॉयल्स विरोधातयुजवेंद्र चहल: 2022- कोलकाता नाइटराइडर्स विरोधातउमरान मलिक: 2022- गुजरात टाइटन्स विरोधातवानंदु हसरंगा: 2022- सनराइजर्स हैदराबादविरोधात