KL Rahul Out On Diamond Duck : पुण्यातील एमसीए मैदानावर लखनौ आणि कोलकाता यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनौचा कर्णधार एकही चेंडू न खेळता धावबाद झाला. एकही चेंडू न खेळता बाद झाल्यानंतर क्रिकेटमध्ये डायमंड डक म्हटले जाते... कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या अचूक थ्रोमुळे राहुलला तंबूत परतावे लागले. यंदाच्या हंगामातील राहुलचा हा तिसरा डक आहे, याचा अर्थ तिसऱ्यांदा तो शून्यावर बाद झाला आहे.  राहुल बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर मिम्स व्हायरल झाले. अनेकांनी मजेदार मिम्स शेअर केले. यामध्ये एका नेटकऱ्याने राहुलला प्रेयसीवरुन ट्रोल केले. 'डायमंड रिंग की बात हुई थी 'डायमंड डक' की नहीं' असे म्हणत राहुलला ट्रोल केले...व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा


पाहा मिम्स.. 


 


























नेमकं काय घडलं? - 
लखनौ आणि कोलकाता सामन्यातील पहिलं षटक सुरु होतं. स्ट्राईकवर डी कॉक असून राहुल नॉनस्ट्राईकवर होता. अशावेळी षटकाचा पाचवा चेंडू डी कॉकने मारला तो धाव घेण्यासाठी धावला पण त्याचं आणि राहुलमध्ये योग्य ताळमेळ न बसल्याने त्यांनी धाव घेणं कॅन्सल करत राहुल पुन्हा नॉनस्ट्राईकच्या दिशेने पळाला. त्याचवेळी श्रेयसने अचूक थ्रो टाकला जो बरोबर स्टम्प्सना लागला आणि राहुल धावचीत झाला. 


हे देखील वाचा-