IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात होऊन महिना झाला आहे. आयपीएलचा अर्धा हंगाम संपलाय, पण कोट्यवधी रुपयांना विकत घेतलेल्या खेळाडूंना अद्याप संघात स्थान मिळालं नाही. आयपीएलच्या 15 व्या हंगामाआधी झालेल्या मेगालिलावात संघानी पाण्यासारखा पैसा ओतला. अनेक स्टार खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिले. पण काही खेळाडूंना अद्याप संघात स्थान मिळाले नाहीत. संघांनी कोट्यवधी खर्च करुन खरेदी केलेले खेळाडू अद्याप बेंचवरच आहे. प्रतिभा असतानाही या खेळाडूंना संघात स्थान मिलाले नाही... पाहूयात या खेळाडूंबद्दल...
आयपीएलच्या 14 व्या हंगामात राजस्थानकडून खेळणाऱ्या चेतन साकरियाला यंदा दिल्लीने 4.2 कोटी रुपयात खरेदी केले. 2021 मध्ये चेतन साकरियाने 14 विकेट घेतल्या होत्या. दिल्लीने अद्याप चेतनला संधी दिलेली नाही. त्याचप्रमाणे मागील दोन आयपीएल हंगामात आपल्या वेगाने आणि अचूक यॉर्करने प्रभावीत करणाऱ्या कार्तिक त्यागीलाही अद्याप संघात स्थान मिळाले नाही. हैदराबादने कार्तिकला चार केटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. आतापर्यंत त्यागीला एकही सामना खेळण्यास मिळाला नाही.
अंडर 19 संघाचा कर्णधार यश धुल याला दिल्लीकडून तर राजवर्धन हंगरगेकरला चेन्नईकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. यांच्यावर कोट्यवधींची बोली लागली होती. आतापर्यंत यांना आयपीएलचा एकही सामना खेळण्यास मिळालेला नाही. दिल्ली, गुजरात टाइटन्स आणि सनराइजर्स हैदराबाद या संघांनी कोट्यवधी रुपयांना विकेत घेतल्या दोन दोन संघांना आतापर्यंत प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलेले नाही. दिल्लीने चेतन साकरियाशिवाय विकेटकिपर केएस भरतला संधी दिली नाही. हैदराबादने कार्तिक त्यागीशिवाय न्यूझीलंडचा विकेटकिपर ग्लेन फिलिप्सला बेंचवरच बसवलेय. गुजरातने 1.10 कोटींमध्ये खरेदी केलेल्या वेस्टविंडिजच्या डोमनिक ड्रेक्स आणि 1.7 कोटींमध्ये खरेदी केलेल्या जयंत यादवला बेंचवर बसवलेय. कोलकाताने अफगानिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद नबीला अद्याप संधी दिली नाही.
कोट्यवधींना विकत घेतल्यानंतरही खेळाडूंना बेंचवरच बसवले, पाहा यादी
खेळाडू | संघ | किंमत |
चेतन साकरिया | दिल्ली | 4.2 कोटी |
कार्तिक त्यागी | हैदराबाद | 04 कोटी |
केएस भरत | दिल्ली | 02 कोटी |
जयंत यादव | गुजरात | 1.7 कोटी |
ग्लेन फिलिप्स | हैदराबाद | 1.5 कोटी |
राजवर्धन हंगरगेकर | चेन्नई | 1.5 कोटी |
डोमनिक ड्रेक्स | गुजरात | 1.10 कोटी |
मोहम्मद नबी | कोलकाता | 01 कोटी |