DC vs RR, IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यामध्ये शुक्रवारी आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 34 वा सामना होणार आहे. वानखेडे मैदानावर सायंकाळी साडेसात वाजता दिल्ली आणि राजस्थान यांच्यात मुकाबला होणार आहे. दिल्लीने आतापर्यंत सहा सामन्यात तीन विजय मिळवले आहेत. तर राजस्थानने सहा सामन्यात चार विजय मिळवले आहेत. दिल्ली गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे तर राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली आणि राजस्थान संघाने आपल्या मागील सामन्यात दमदार प्रदर्शन केले होते. वानखेडे मैदानावर रंगणारा दिल्ली आणि राजस्थान यांच्यातील सामना रोमांचक होणार यात कोणतेही दुमत नाही.
दिल्ली आणि राजस्थान संघ संतुलित दिसत आहे. दोन्ही संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी मजबूत आहे. त्यामुळे सामना रंगतदार होणार आहे. डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत तुफान फॉर्ममध्ये आहेत. खलील अहमद आणि मुस्तफिजुर रेहमान यांचा भेदक मारा तसेच कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांची फिरकी...दिल्लीची ताकद वाढवते. रॉवमन पॉवेलचा फॉर्म दिल्लीसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. रॉवमनला अद्याप आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नाही.
राजस्थानचा विचार करता जोश बटलर आणि शिमरन हेटमायर तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याशिवा संजू सॅमसनची बॅटही तळपते. तर यजुवेंद्र चहल आणि अश्विन ही जोडी भल्या भल्या फलंदाजांना बाद करु शकते. प्रसिद्ध कृष्णा आणि ट्रेंट बोल्ट यांचा भेदक माराही फलंदाजांना अडचणीत टाकतो. त्यामुळे सामना रोमांचक होणार यात दुमत नाही. देवदत्त पडिकल आणि रियान पराग यांचा फॉर्म राजस्थानसाठी चिंतेचा विषय आहे.
DC vs RR हेड टू हेड रेकॉर्ड -
राजस्थान आणि दिल्ली संघाने आतापर्यंत आयपीएलमध्ये 24 सामने खेळले आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 12 - 12 सामने जिंकले आहेत. यंदाच्या हंगामात दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने आले आहेत. मागील रेकॉर्ड पाहाता दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना होऊ शकतो. जो संघ दमदार प्रदर्शन करेल, तो बाजी मारेल.