Jos Buttler IPL Hundred : राजस्थानचा सलामी फलंदाज जोस बटलर याने पुन्हा एकदा रॉयल खेळी केली. मुंबईच्या वानखेडे मैदानावर दिल्लीविरोधात सुरु असलेल्या सामन्यात जोस बटलर याने वादळी खेळी करत अर्धशतकी खेळी केली. जोस बटलरने 57 चेंडूत अर्धशतक झळकावले. जोस बटलरचे यंदाच्या हंगामातील हे तिसरं अर्धशतक झळकावले आहे.
जोस बटलरने 57 चेंडूत 8 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने शतकी खेळी केली. जोस बटलरने मागील सात डावात तिसरं अर्धशतकं झळकावलं आहे. एका हंगमात सर्वाधिक अर्धशतकं झळकावण्याचा विक्रम आरसीबीच्या विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने 2016 मध्ये आयपीएलमध्ये चार शतकं झळकावली होती. जोस बटलरला हा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. राजस्थानचे आणखी सात सामने बाकी आहेत. या सामन्यात बटलरला विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
प्रथम फलंदाजी करताना जोस बटलरने संयमी खेळी केली त्यानंतर तुफानी फलंदाजी करत शतक झळकावले. यंदाच्या हंगामातील जोस बटलरचं हे तिसरं शतक आहे. तर आयपीएलमधील चौथ शतक झळकावलेय. आयपीएलमधील 71 डावात जोस बटलरने चौथं अर्धशतक झळकावलेय. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं ख्रिस गेलच्या नावावर आहेत. गेलने 141 डावात 6 शतकं झळकावली आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. कोहलीने 206 डावात 5 शतकं झळकावली आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जोश बटलर पोहचला आहे. जोस बटलरच्या नावावर 71 जावात चार शतकं आहेत. त्यानंतर शेन वॉटसन आणि डेविड वॉर्नर यांचा क्रमांक लागतो. शेन वॉटसनने 141 तर डेविड वॉर्नरने 154 डावात प्रत्येकी चार चार शतकं झळकावली आहेत.