Virat Kohali : 2021 टी 20 विश्वचषकानंतर टी 20 आंतरराष्ट्रीय मध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा करणाऱ्या विराट कोहलीने आज आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. कोहलीने जाहीर केले आहे की, यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएल 2021 च्या उत्तरार्धानंतर आपण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद सोडणार आहे.







आरसीबीमध्ये कोहलीचा आतापर्यंतचा विक्रम कसा आहे?
कोहलीचा कर्णधार म्हणून आरसीबीसाठी अत्यंत खराब रेकॉर्ड होता. तो 2013 पासून कर्णधारपद सांभाळत आहे पण एकदाही सांघिक विजेतेपद पटकावू शकला नाही. 2016 नंतर, आरसीबीचा संघ गेल्या वर्षी प्लेऑफमध्ये पात्र ठरला होता. 2017 आणि 2019 मध्ये तो गुणतालिकेच्या तळाशी होता तर 2018 मध्ये संघ सहाव्या स्थानावर होता. 2016 चा हंगाम कोहलीसाठी उत्तम होता, त्या काळात त्याने 973 धावा केल्या. त्यानंतर केवळ 2018 मध्ये कोहली 500 धावांच्या पुढे पोहोचू शकला. आयपीएल 2021 च्या हंगामात त्याने सात सामन्यांत 33 च्या सरासरीने धावा केल्या आहेत, ज्यात फक्त एक अर्धशतक आहे.


टी -20 वर्ल्डकपनंतर टी -20 फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडणार
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे घोषणा केली आहे की, आगामी 2021 टी 20 विश्वचषकानंतर टी -20 फॉरमॅटमध्ये तो टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये विराट कोहली म्हणाला की, त्याने हा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेतला आहे. कामाचा ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्याने सांगितले आहे.