IPL 2023 KKR Litton Das Replacement : कोलकाता आणि हैदराबाद यांच्यामध्ये आज रंगतदार लढत होत आहे. हैदराबादच्या मैदानावर या दोन्ही संघात लढत होत आहे. या सामन्यापूर्वीच कोलकात्याच्या संघात वेस्ट इंडिजच्या विस्फोटक फलंदाजाची एन्ट्री झाली आहे. लिटन दास याच्या जागी कोलकात्याने वेसट इंडिजच्या जॉनसन चार्ल्स याला ताफ्यात घेतलेय. कौटंबिक कारणामुळे लिटन दास याने आयपीएलमधून माघार घेतली होती. त्याच्या जागी कोलकात्याने वेस्ट इंडिजच्या जॉनसन चार्ल्स याला ताफ्यात घेतलेय. कोलकात्याने चार्ल्स याला ५० लाख रुपयांमध्ये आपल्या संघात घेतलेय.
कोलकाता आणि आयपीएल यांनी ट्वीट करत लिटन दास याच्या रिप्लेसमेंटची माहिती दिली आहे. आयपीएलने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर चार्ल्स याच्याबाबात माहिती दिली आहे. कोलकाता नाइट रायडर्सने गुरुवारी लिटन दास याच्याजागी जॉनसन चार्ल्स याला संघात घेतलेय. चार्ल्स विकेटकिपर फलंदाज आहे. वेस्ट इंडिजसाठी चार्ल्स याने ४१ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत यामध्ये त्याने ९७१ धावा केल्या आहेत. चार्ल्स याने वेसट इंडिजच्या २०१६ च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य आहे. २०२२ च्य संघाचा सदस्यही राहिलाय. कोलकात्याने चार्ल्स याला ५० लाख रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतलेय.
जॉनसन वेस्ट इंडीजसाठी ४८ एकदिवसीय सामने खेळला आहे. यादरम्यान त्याने दोन शतक आणि चार अर्धशतकासह 1283 धावा चोपल्या आहेत. चार्ल्स याने आतापर्यंत 224 टी20 सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने 5607 धावा केल्या आहेत. चार्ल्सच्या नावावर टी20 फॉर्मेटमध्ये तीन शतके आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 118 इतकी आहे. चार्ल्स याचा विकेटकीपिंगमध्ये चांगला विक्रम आहे. विकेटच्या मागे चार्ल्स याने ८७ जणांना बाद केलये.
कोलकात्याचे यंदाच्या हंगामातील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. नीतीश राणाच्या नेतृत्वातील कोलकाता संघाला नऊ सामन्यत फक्त तीन विजय मिळवता आले आहेत. तर सहा सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. कोलकाता संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे.