आयपीएलच्या (IPL) हंगामात एप्रिलमधील पहिल्याच दिवशीच्या सामन्यात पंजाबची भल्ले भल्ले झाली असून लखनौच्या नवाबांवर 8 गडी राखून किंग्ज इलेव्हन पंजाबने विजय मिळवला. त्यानंतर, आज रायल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होत असून गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे, बंगळुरुचा विराट संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र, पहिल्या 10 ओव्हरमध्येच बंगळुरुच्या संघाची दयनीय अवस्था पाहायला मिळाली. मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीपुढे बंगळुरुच्या टॉप फलंदाजांनी नांग्या टाकल्या. त्यात, फिलीप साल्टने मोहम्मद सिराजला (Mohammad siraj) षटकार ठोकताच सिराजनेही दुसऱ्या चेंडूवर त्याची दांडी उडवत बाहेरचा रस्ता दाखवला. त्यावेळी, मैदानावर सिराजने हात उंचावत फिलिप्सला चांगलीच टशन दिली.
बंगळुरू आणि गुजरात लायन्स संघातील आजच्या सामन्यात सुरुवातीलाच गोलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं. मोहम्मद सिराजने भेदक गोलंदाजी करत बंगळुरु संघाच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच दबाव टाकला. सिराजने पहिल्या काही षटकांत दोन विकेट्स घेत बंगळुरु संघाची दाणादाण उडवून दिली. डी पड्डीकलला 4 धावांवर तंबूत पाठवल्यानंतर सिराजन फिलीप साल्टलाही चांगलीच टशन दिली. विशेष म्हणजे सामन्याच्या 4 थ्या षटकात सिराजच्या तिसऱ्या चेंडूवरन फिलीप्सने उत्तुंग षटकार ठोकत चेंडू मैदानाबाहेर पाठवला होता. त्यामुळे, सिराज काहीसा दबावात होता, तरीही पुढच्याच चेंडूवर सिराजने फिलिप्स साल्टचा त्रिफळा उडवत त्याला मैदानाबाहेर हाकललं. सिराजला क्लीन बोल्ड केल्यानंतर सिराजने हात उंचावत मैदानात जोरदार सेलीब्रेशन केलं, चांगलीच टशन दिल्याचं पाहायला मिळालं. आजच्या सामन्यातील साल्ट अन् सिराजची ही खुन्नस लक्षवेधी ठरली. सिराजच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाल्यानंतर तोंडात काहीतरी फुटफुटत फिलीप्स मैदानाबाहेर पडला. त्यामुळे, सोशल मीडियावरही या ओवर ड्रामाचा व्हिडिओ व्हायरल होत असून दोन्ही संघाचे फॅन्स आपल्या संघाची बाजू घेऊन क्रिकेटचा आनंद घेत आहेत.
दरम्यान, सिराजने पहिल्या 10 षटकांचा खेळ होण्यापूर्वी 3 षटकांत केवळ केवळ 15 धावा देत 2 गडी बाद केले होते. तर, अर्शद खान आणि इशांत शर्माने प्रत्येकी एक-एक गाडी बाद केल्याने पहिल्या 10 षटकांत रायल चॅलेंज बंगरुळूच्या संघाला केवळ 72 धावांवरच मजल मारता आली होती.
हेही वाचा
ग्राहकांना शॉक! लाईट बिल कमी येणार नाहीच; वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती