RCB Playing 11 Against MI : विराट कोहलीच्या आरसीबीसाठी आतापर्यंत यंदाचा हंगाम अतिशयश खराब ठरला. किंग कोहली कर्णधार नाही, पण आरसीबी म्हटले की त्याचं नाव येतेच. विराट कोहली धावांचा पाऊस पाडतोय, पण इतरांकडून साथ मिळत नसल्यामुळे आरसीबीला फटका बसतोय. त्याशिवाय गोलंदाजांकडूनही हवी तशी साथ मिळत नाही. त्यामुळे पाच सामन्यात आरसीबीला चार पराभव पचवावे लागले.  विराट कोहली यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरलाय. आजच्या सामन्यातही विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेलच. आजचा सामना मुंबईला जिंकायचा असेल, तर आरसीबीला प्लेईंग 11 मध्ये एक दोन नाही तर सहा बदल करावे लागतील. 


आयपीएल 2024 मध्ये आरसीबीची सुरुवात अतिशय खराब झाली आहे. आतापर्यंत आरसीबीने पाच सामने खेळले आहेत, यामध्ये त्यांना चार सामने गमावावे लागलेत. आरसीबीला फक्त एक विजय मिळवावा लागला. गुणतालिकेत आरसीबी तळाला नवव्या क्रमांकावर आहे. आरसीबीचं यंदाच्या हंगामातील आव्हान अतिशय खडतर झालेय, पम आव्हान अद्याप संपलेले नाही. आरसीबीला कमबॅक करण्याची संधी अद्याप आहेच. त्यासाठी आरसीबीला विजयाची गरज आहे. विजयी ट्रॅकवर आरसीबीवर परतल्यानंतर प्लेऑफमधये पोहचू शकतं. 


आजच्या सामन्यात आरसीबीच्या ताफ्यात सहा बदलाची शक्यता 


आयपीएल 2024 मध्ये आरसीबीने काही मॅचविनर खेळाडूंना अद्याप संघात स्थान दिलेले नाही. आज वानखेडेमध्ये होणाऱ्या सामन्यात आरसीबीच्या संघात काही बदल होऊ शकतात. मुंबईचा पराभव कऱण्यासाठी आरसीबीला मजबूत संघ उतरावा लागेल. सौरव चौहान, कॅमरून ग्रीन, मयंक डागर, रीस टॉप्ले, यश दयाल आणि हिमांशू राणा या सहा खेळाडूंना आजच्या सामन्यात आरसीबी बेंचवर बसवू शकते. 


या खेळाडूंना प्लेईंग 11 मध्ये स्थान द्यायला हवे 


कॅमरुन ग्रीनच्या जागी इंग्लिश अष्टपैलू विल जॅक्स याला प्लेईंग 11 मध्ये संधी द्यायला हवी. जॅक्स विस्फोटक फलंदाजीसोबत ऑफ स्पिन गोलंदाजीही करु शकतो. त्याशिवाय रीस टॉप्लेच्याजागी लॉकी फर्ग्यूसन याला प्लेईंग 11 मध्ये स्थान द्यायला हवं, त्याशिवाय  महिपाल लोमरोर आणि आकाश दीप यांनाही अंतिम 11 खेळाडूमध्ये संधी द्यायला हवी. 


मुंबई इंडियन्सविरोधात आरसीबीची संभाव्य प्लेईंग 11


विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि विजय कुमार वैशाख.