MI vs PBKS Qualifier 2 Rain Update : मुंबई-पंजाब सामन्यादरम्यान रिमझिम पाऊस, क्वालिफायर-2 मध्ये कमीत-कमी किती षटकांचा सामना होणार? जाणून घ्या बीसीसीआयचा नियम
Ahmedabad Weather News : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्ज (PBKS) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील आयपीएल क्वालिफायर 2 सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला आहे.

Punjab Kings vs Mumbai Indians Qualifier 2 : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्ज (PBKS) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील आयपीएल क्वालिफायर 2 सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला आहे. पंजाब किंग्ज (PBKS) कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. थंड वारा आणि ढगाळ वातावरणामुळे त्याने असा निर्णय घेतला, परंतु पावसामुळे सामना उशिरा सुरू होत आहे. ग्राउंड स्टाफने खेळपट्टी झाकली आहे आणि पावसामुळे सामना न खेळल्यास काय होईल?
It has started to rain again in Ahmedabad 🌧️
— IndianPremierLeague (@IPL) June 1, 2025
We will be back shortly with further updates.#TATAIPL | #PBKSvMI | #Qualifier2 | #TheLastMile https://t.co/dJ15ov7NsU
जर पावसामुळे सामना रद्द झाला तर...
अहमदाबादमध्ये पावसामुळे पीबीकेएस आणि एमआय यांच्यातील क्वालिफायर 2 सामन्याची सुरुवात उशिरा होत आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जर पाऊस सुरू राहिला तर सामन्याचे नियम बदलले जातील. जर पावसामुळे सामना रद्द झाला तर पॉइंट टेबलमध्ये वरचा संघ फायनलमध्ये पोहोचेल. याचा अर्थ पीबीकेएस फायनलमध्ये पोहोचेल. 3 जून रोजी होणाऱ्या फायनलमध्ये ते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करतील. हवामान खात्याच्या मते, अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता कमी आहे.
पीबीकेएसला क्वालिफायर 1 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. आता त्यांना अंतिम फेरीत त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी असेल. लीग टप्प्यानंतर पीबीकेएस 19 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर होते. एमआय 16 गुणांसह चौथ्या स्थानावर होते. एमआयने एलिमिनेटर जिंकला आणि पीबीकेएसने क्वालिफायर 1 गमावला. पण, जर पावसामुळे सामना रद्द झाला तर श्रेयस अय्यरचा संघ अंतिम फेरीत जाईल.
🚨 Toss 🚨@PunjabKingsIPL won the toss and elected to bowl first against @mipaltan in #Qualifier2
— IndianPremierLeague (@IPL) June 1, 2025
Updates ▶️ https://t.co/vIzPVlDqoC#TATAIPL | #PBKSvMI | #TheLastMile pic.twitter.com/l3PcmZvc9Y
काहीही झाले तरी, किमान 5 षटकांचा होणार सामना...
पावसामुळे सामना उशिरा सुरू होत आहे. ग्राउंड स्टाफ खेळपट्टी कव्हर करत आहे. सामना सुरू होण्याची वाट पाहत आहे. जर पावसामुळे सामना लेट झाला तर सामन्याचा कालावधी कमी केला जाईल. खेळ आहे त्या टाईमवर सुरू झाला नाही तर प्रत्येक संघाला किमान पाच षटके खेळावी लागतील. जर मुसळधार पाऊस पडला आणि 5 षटकांचा सामनाही खेळवता आला नाही, तर खेळ रद्द केला जाईल.
अहमदाबाद हवामान अहवाल
अॅक्यूवेदरनुसार, पावसाची शक्यता कमी होती. परंतु टॉसनंतर जेव्हा मुसळधार पाऊस सुरू झाला, तेव्हा मैदान झाकावे लागले. आता पावसामुळे वेगवान गोलंदाजांना फायदा होईल. विशेषतः पंजाब.





















