शुभमन गिलला जा जा जा करणाऱ्या अबरार अहमदला भारताच्या जावयाने दाखवली जागा... PSL मध्ये नेमकं काय घडलं? Video
पाकिस्तान सुपर लीग 2025 चा सामना कराची किंग्ज आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात शुक्रवार 18 एप्रिल रोजी खेळवण्यात आला.

पाकिस्तान सुपर लीग 2025 चा सामना कराची किंग्ज आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात शुक्रवार 18 एप्रिल रोजी खेळवण्यात आला. कराची किंग्जने हा सामना 56 धावांनी जिंकला. सामन्यादरम्यान, कराची किंग्जचा वेगवान गोलंदाज हसन अली (Hasan Ali), जो भारताचा जावई देखील आहे, त्याने अबरार अहमदला (Abrar Ahmed) आऊट केल्यानंतर ज्या पद्धतीने सेलिब्रेशन केले त्यामुळे पीएसएलमध्ये खळबळ उडाली.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील (Champions Trophy) भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यादरम्यान, जेव्हा अबरार अहमदने शुभमन गिलला (Shubman Gill) आऊट केले, तेव्हा तो मैदानात उभा राहिला आणि त्याने डोळ्यांनी पॅव्हेलियनमध्ये जाण्याचा इशारा केला. अबरार अहमदच्या कृत्याचा मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आला आणि त्याने त्याबद्दल माफीही मागितली. भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला होता.
हसन अलीने उडवली अबरार अहमदची खिल्ली
पीएसएलमध्ये कराची किंग्ज आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यातील सामन्यादरम्यान पुन्हा एकदा असेच दृश्य पाहायला मिळाले. या सामन्यात, कराची किंग्जकडून खेळणाऱ्या भारताच्या जावई हसन अलीने क्वेटा ग्लॅडिएटर्सविरुद्ध 4 षटकांत 27 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यादरम्यान, जेव्हा त्याने अबरार अहमदला क्लीन बोल्ड केले, तेव्हा त्याने शुभमन गिलला बाद केल्यानंतर अबरारने जे सेलिब्रेशन केले होते, तेच सेलीब्रेशन त्याने केले. पण, हसन अली लगेच अबरारकडे गेला आणि त्याला मिठी मारली. हसन अली आणि अबरार अहमद यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Hasan Ali, out here sweeping wickets
— PakistanSuperLeague (@thePSLt20) April 18, 2025
Abrar has been clean bowled 🎳#HBLPSLX I #ApnaXHai I #KKvQG pic.twitter.com/p3bX3m6SB9
हसन अलीचे भारताशी खास नाते....
हसन अलीला भारताचा जावई म्हटले जात आहे, कारण त्यांनी 2019 मध्ये भारतातील शामिया आरजू नावाच्या मुलीशी लग्न केले होते. हसन अली आणि शामिया यांनी 2019 मध्ये एकमेकांशी लग्न केले. दोघांनाही 2021 मध्ये एक मुलगी झाली.
हसन अलीने घेतल्या 3 विकेट्स ...
या सामन्यात हसन अलीने 4 षटकांच्या स्पेलमध्ये 27 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. ज्यामध्ये हसन नवाज, ख्वाजा नाफे आणि अबरार अहमद यांच्या विकेटचा समावेश होता. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना कराची किंग्जने जेम्स विन्सच्या 70 धावा आणि डेव्हिड वॉर्नरच्या 31 धावांच्या जोरावर 175 धावा केल्या. प्रत्युत्तरात, क्वेटा ग्लॅडिएटर्सचा संपूर्ण संघ 119 धावांवर ऑलआउट झाला.
हे ही वाचा -





















