Harshit Rana KKR IPL 2024 नवी दिल्ली : कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) आयपीएलच्या फायनलमध्ये सनरायजर्स हैदराबादला (Sun Risers Hyderabad) पराभूत करत विजेतेपद मिळवलं. कोलकाता नाईट रायडर्सच्या अंतिम फेरीतील विजयामध्ये गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडून गोलंदाजांमध्ये सर्वोत्तम कामगिरी हर्षित राणानं (Harshit Rana) केली. हर्षित राणानं केकेआरकडून 19 विकेट घेतल्या. हर्षित राणानं आयपीएल 2024 मध्ये 12 मॅचमध्ये 19 विकेट घेतल्या. हर्षित राणाला केकेआरकडून केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.हर्षित राणासाठी टीम इंडियाची दारं लवकरच उघडू शकतात.
हर्षित राणा यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर होता. हर्षितनं 19 विकेट घेतल्या. तर, सर्वाधिक विकेटसाठी मिळणारी पर्पल कॅप पंजाब किंग्जच्या हर्षल पटेलला मिळाली. हर्षल पटेलनं 14 मॅचमध्ये 24 विकेट मिळाल्या होत्या. वरुण चक्रवर्ती दुसऱ्या क्रमांकावर राहिला, त्यानं 21 विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह 13 मॅचमध्ये 20 विकेट घेतल्या.
हर्षित राणासाठी टीम इंडियाची दारं उघडणार?
हर्षित राणानं आयपीएलमध्ये 2022 मध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी त्याला केवळ 2 मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली. हर्षित राणानं 2023 च्या आयपीएलमध्ये 6 मॅचमध्ये 5 विकेट घेतल्या. मात्र, 2024 चं आयपीएल हर्षित राणासाठी लकी ठरलं. हर्षित राणानं 13 मॅचमध्ये 19 विकेट घेतल्या. हर्षित राणानं लखनौ सुपर जाएंटस विरुद्ध 24 धावा देत 3 विकेट घेतल्या. मुंबई इंडियन्स आणि सनरायर्स हैदराबाद यांच्याविरुद्ध त्यानं 2-2 विकेट घेतल्या. हर्षत राणानं फायनलमध्ये हैदराबाद विरुद्ध 24 धावा दिल्या होत्या.
हर्षित राणाचं देशांतर्गत क्रिकेटमधील करिअर पाहता ते चांगलं राहिलं आहे. केकेआरनं 7 फर्स्ट क्लास मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं 28 विकेट घेतल्या आहेत. हर्षित राणानं एका मॅचमध्ये 108 धावा देत 10 विकेट घेतल्या. त्यांनी लिस्ट एच्या 14 मॅचमध्ये 22 विकेट घेतल्या. हर्षित राणानं 25 टी 20 मॅचेसमध्ये 28 विकेट घेतल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं 9 डावांमध्ये 343 धावा केल्या आहेत. आता त्याला लवकरच टीम इंडियामध्ये संधी मिळू शकते.
दरम्यान, केकेआरनं अंतिम फेरीच्या लढतीत सनरायजर्स हैदराबादला 8 विकेटनं पराभूत केलं होतं. केकेआरनं सनरायजर्स हैदराबादला पराभूत करत तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवलं होतं. केकेआरनं यापूर्वी 2012 आणि 2014 ला विजेतेपद मिळवलं होतं.
संबंधित बातम्या :