Royal Challengers Bangalore wins first IPL title in 18 Years : आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करत आपल्या 18 वर्षांत पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकली. या ट्रॉफीसाठी आसुसलेला विराट कोहली सामन्यादरम्यान लहान मुलासारखा रडू लागला. आरसीबी विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचताच कोहली भावुक झाला. आरसीबी जिंकताच विराट कोहली मैदानावर बसला आणि ढसाढसा रडू लागला. 

आरसीबी चॅम्पियन होताच विराट कोहलीला रडताना संपूर्ण जगाने पाहिले, पण तुम्हाला माहिती आहे का की मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या देखील आरसीबीच्या विजयाने आनंदी होता आणि त्याचे डोळे पाणावले होते. या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याने एक भावनिक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली. 

हार्दिक पांड्याचे डोळे पाणावले?

आरसीबी चॅम्पियन बनण्यामागील आणि हार्दिक पांड्या रडण्यामागील कारण म्हणजे कृणाल पांड्या. आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात त्याने शानदार गोलंदाजी करून आपल्या संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हार्दिकने त्याच्या मोठ्या भावासाठी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराने लिहिले, माझ्या डोळ्यात अश्रू आहेत, मला तुझा खूप अभिमान आहे माझ्या भावा...

अंतिम सामन्याचा हिरो ठरला कृणाल पांड्या

पंजाब किंग्जविरुद्धच्या अंतिम सामन्यात कृणाल पांड्याने फलंदाजीने चांगली कामगिरी केली नसली तरी, त्याने चेंडूने चमत्कार केला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 190 धावा केल्या होत्या. या मैदानावर हे लक्ष्य फार मोठे नव्हते. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने चांगली सुरुवात केली, परंतु कृणालने मधल्या षटकांमध्ये शानदार गोलंदाजी करून सामन्याची दिशा बदलली. त्याने 4 षटकांत फक्त 17 धावा दिल्या आणि 2 विकेट घेतल्या.

या कामगिरीसाठी त्याला आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्याचा 'सामनावीर' म्हणून निवडण्यात आले. कृणाल पांड्या हा जगातील एकमेव खेळाडू आहे ज्याने आयपीएलच्या अंतिम सामन्यात दोनदा 'सामनावीर' पुरस्कार जिंकला आहे. कृणाल पांड्याने आयपीएल 2017 च्या अंतिम सामन्यातही शानदार कामगिरी केली आणि मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

हे ही वाचा -  

Vaibhav Suryavanshi IPL 2025 : वैभव सूर्यवंशीला मिळालं मोठे बक्षीस, पण वापरल्यास पोलीस ठोकणार दंड? जाणून घ्या IPL नं असं काय दिलं?

RCB Captain Rajat Patidar : रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून एन्ट्री, आरसीबीसाठी लग्नही पुढे ढकलले; आता किंग कोहलीचे स्वप्न पूर्ण केले, कर्णधार रजत पाटीदारची रंजक कहाणी