GT vs DC IPL 2025 : जोस बटलरने तुफानी खेळी, गुजरात टायटन्सचा ७ विकेट्सनी विजय, दिल्लीचा पराभव
GT vs DC IPL 2025 Updates : शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात संघाने या हंगामात चमकदार कामगिरी करत आहे.
किरण महानवरLast Updated: 19 Apr 2025 07:44 PM

पार्श्वभूमी
Gujarat Titans vs Delhi Capitals Live Updates : शनिवार म्हणजे आज 'डबल हेडर' चा दिवस.... आयपीएल 2025 मध्ये दोन सामने... पहिला सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात आहे. आयपीएलचा...More
Gujarat Titans vs Delhi Capitals Live Updates : शनिवार म्हणजे आज 'डबल हेडर' चा दिवस.... आयपीएल 2025 मध्ये दोन सामने... पहिला सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात आहे. आयपीएलचा हा 35 वा सामना गुजरातच्या घरात म्हणजे अहमदाबाद येथे होणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात संघाने या हंगामात चमकदार कामगिरी करत आहे. त्याने आतापर्यंत 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि 8 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये तिसर्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटलने त्यांच्या 6 सामन्यांत 5 जिंकले आहेत. 10 गुणांसह दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे.
जोस बटलरने तुफानी खेळी, गुजरात टायटन्सचा ७ विकेट्सनी विजय, दिल्लीचा पराभव
जोस बटलर आणि शेरफेन रदरफोर्ड यांच्यातील शानदार भागीदारीमुळे गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा सात विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत आठ गडी गमावून 203 धावा केल्या. प्रत्युत्तर, बटलरने 54 चेंडूत 11 चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 97 धावा ठोकल्या आणि गुजरातने 19.2 षटकांत 3 बाद 204 धावा करून सामना जिंकला.